Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोटक विद्यमान नेट बँकिंगसह यूपीआय, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड अशा विविध...

कोटक विद्यमान नेट बँकिंगसह यूपीआय, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड अशा विविध पर्यायांनी युक्‍त एकसंधी जीएसटी पेमेंट सेवा लाँच करणारी भारतातील पहिली बँक ठरली

मुंबई, जानेवारी १८, २०२४: डिजिटल पेमेंट्सना प्रमोट करण्‍यासह आर्थिक व्‍यवहार सुलभ करण्‍याप्रती भारत सरकारच्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (‘केएमबीएल’/’कोटक’) आज विद्यमान नेट बँकिंग सुविधेव्‍यतिरिक्‍त यूपीआय, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड अशा विविध पर्यायांच्‍या माध्‍यमातून एकसंधी जीएसटी पेमेंट्स सेवेच्‍या लाँचची घोषणा केली. कोटक करदात्‍यांना जीएसटी पोर्टलच्‍या ‘ई-पेमेंट’वरील त्‍यांच्‍या पसंतीचे डिजिटल पेमेंट मोड निवडत त्‍यांचे जीएसटी भरण्‍यास सक्षम करणारी भारतातील पहिली बँक आहे.

 

कोटक महिंद्रा बँकेने भारतातील डिजिटल पब्लिक इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरला पाठिंबा कायम ठेवला आहे आणि विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून डिजिटल मार्केटप्‍लेसच्‍या विकासामध्‍ये सहभाग घेत आहे. नवीन एकसंधी व विविध पेमेंट पर्यायांसह इतर बँकांमधील (पूर्वी विशिष्‍ट पेमेंट पर्यायांसाठी अनधिकृत) ग्राहक देखील कार्यक्षमपणे व विश्‍वसनीयरित्‍या त्‍यांचे जीएसटी पेमेंट्स पूर्ण करू शकतील. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे कोटकने गेल्‍या वर्षी केंद्राच्‍या जीएसटी पोर्टलसोबत सहयोग केला, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या नेट बँकिंग सेवेच्‍या माध्‍यमातून कर भरण्‍यासाठी युजर-अनुकूल व्‍यासपीठ प्रदान करण्‍यात आले आहे.

 

कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्‍या सार्वजनिक व्‍यवहार व सरकारी व्‍यवसायाचे अध्‍यक्ष राघवेंद्र सिंग म्‍हणाले, ”आम्‍ही जगभरातील अनेक देशांनी मान्‍यताकृत व अवलंब केलेल्‍या डिजिटल पेमेंट क्रांतीचे नेतृत्‍व करणाऱ्या भारत सरकारचे कौतुक करतो. विविध जीएसटी पेमेंट पर्याय लाँच करणारी भारतातील पहिली कंपनी म्‍हणून आम्‍हाला कोटक ग्राहकांसह सर्व करदात्‍यांसाठी सर्वोत्तम ग्राहक अनुभवाच्‍या माध्‍यमातून भावी डिजिटल पेमेंट्ससाठी मार्ग सुलभ करण्‍याचा आनंद होत आहे.”

 

केएमबीएलच्‍या पेमेंट गेटवेच्‍या माध्‍यमातून जीएसटी कसा भरावा:

 

www.gst.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा.

चलन तयार करा आणि ई-पेमेंट निवडा.

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआय अशा विविध पेमेंट पर्यायांमधून निवड करा.

कोटक महिंद्रा बँक निवडा*

 

पेमेंट करा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments