निवडक गॅलॅक्सी स्मार्टफोन्सवर जवळपास ५७ टक्क्यांची सूट आणि सॅमसंग प्रिमिअम व लाइफस्टाइल टेलिव्हिजन्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४८ टक्क्यांची सूट
· सॅमसंग गॅलॅक्सी टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वीअरेबल्स जवळपास ५० टक्क्यांपर्यंतच्या सूटसह उपलब्ध असतील
· रेफ्रिजरेटर्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ५२ टक्क्यांच्या सूटसह जवळपास १५१२५ रूपयांचे एक्स्चेंज फायदे
· आघाडीच्या कार्डसवर जवळपास २२.५ टक्के कॅशबॅक (जवळपास २५००० रूपये)
गुरूग्राम, जानेवारी 20, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने त्यांच्या ग्रॅण्ड रिपब्लिक डे सेलच्या लाँचची घोषणा केली आहे. या सेलमध्ये सॅमसंगची विविध उत्पादने जसे गॅलॅक्सी स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स, वीअरेबल्स, सॅमसंग टीव्ही आणि इतर डिजिटल अप्लायन्सेसवर बंपर ऑफर्स व कॅशबॅक मिळेल. या ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील. ग्राहकांना एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि इतर आघाडीच्या बँक डेबिट व क्रेडिट कार्डसवर जवळपास २२.५ टक्के कॅशबॅक (जवळपास २५००० रूपये) मिळेल.
या बोनान्झा सेलदरम्यान गॅलॅक्सी ए सिरीज, एम सिरीज, एफ सिरीज, एस सिरीजचे निवडक मॉडेल्स आणि गॅलॅक्सी झेड सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५७ टक्के सूट मिळू शकते. ग्राहकांना नवीन गॅलॅक्सी एस२४ सिरीज स्मार्टफोन्सच्या प्री-बुकिंगवर अदभुत ऑफर्स देखील मिळतील. ग्रॅण्ड रिपब्लिक डे सेल अंतर्गत ग्राहक गॅलॅक्सी एस२३ फक्त ५४९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. गॅलॅक्सी बुक गो, गॅलॅक्सी बुक३ आणि गॅलॅक्सी बुक ३ प्रो असे गॅलॅक्सी लॅपटॉप्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ४६ टक्के सूट मिळू शकते, तसेच गॅलॅक्सी टॅब्लेट्सचे निवडक मॉडेल्स, वीअरेबल्स व अॅक्सेसरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५० टक्के सूट मिळू शकते.
सॅमसंग टेलिव्हिजन्सचे प्रिमिअम व लाइफस्टाइल मॉडेल्स खरेदी करणारे ग्राहक जवळपास ४८ टक्के सूटसह जवळपास १५२५० रूपयांपर्यंतच्या अतिरिक्त एक्सचेंज लाभांचा आनंद घेऊ शकतात. निओ क्यूएलईडी आणि क्यूएलईडीचे निवडक मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुढीलपैकी खात्रीदायी स्पेशल गिफ्ट मिळेल – १२४९९० रूपये किमतीचा गॅलॅक्सी एस२३ अल्ट्रा किंवा ६९९९० रूपये किमतीचा ५० इंच सेरिफ टीव्ही किंवा ३८९९० रूपये किमतीचा साऊंडबार (क्यू७००सी / सी४५०).
सेलदरम्यान रेफ्रिजरेटर्स सारखे सॅमसंग डिजिटल अप्लायन्सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रेफ्रिजरेटर्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ५२ टक्के सूट मिळेल. ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर जवळपास १५१२५ रूपयांचे एक्स्चेंज फायदे देखील मिळू शकतात.
२८ लीटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्ह आणि ३२ लीटर वाय-फाय एनेबल बीस्पोक मायक्रोवेव्ह अशा मायक्रोवेव्ह्जच्या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ४५ टक्के सूट मिळू शकते. फुली ऑटोमॅटिव्ह वॉशिंग मशिन्सच्या इकोबबलTM श्रेणीचे निवडक मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राकांना जवळपास ४९ टक्के सूटसह अपग्रेड बोनस म्हणून ३००० रूपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल.


