Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडसर्च येथे नॅशनल एचआरडी नेटवर्क स्टुडंट चॅप्टरची स्थापना

इंडसर्च येथे नॅशनल एचआरडी नेटवर्क स्टुडंट चॅप्टरची स्थापना

पुणे,24 डिसेंबर 2024 : उद्योग,व्यवस्थापन व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहयोग मजबूत करण्याच्या प्रयत्नातून नॅशनल एचआरडी नेटवर्क व इंडसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिर्सच च्या सहकार्याने इंडसर्च बावधन कॅम्पस येथे स्टुडंट चॅप्टरची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्त आरोहन-रायझिंग टुगेदर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲक्सेंचर टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक व तंत्रज्ञान प्रचारक श्रीकांत सारडा, विशेष अतिथी म्हणून एनएचआरडीएन चे सरसंचालक डॉ.धनंजय सिंग यांसह इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी,संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर, इंडसर्चच्या युजी प्रोग्रामच्या डीन व इंटरनॅशनल रिलेशन्सच्या प्रमुख डॉ.सुनिता जोशी,एनएचआरडी इंडसर्च स्टुडंट चॅप्टरच्या मार्गदर्शक डॉ.आश्विनी तिखे व प्रा.वर्षा केदार आणि एनएचआरडी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष अमन राजाबली आदी मान्यवर उपस्थित होते. द इम्पॅक्ट ऑफ सोशल मिडिया ऑन ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट ॲन्ड चॅलेंजेस फेस्ड बाय ऑर्गनायझेशन्स हा या चर्चासत्राचा विषय होता.
ॲक्सेंचर टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक व तंत्रज्ञान प्रचारक श्रीकांत सारडा म्हणाले की,आज जगातील सर्वांत मोठे मनुष्यबळ आपल्याकडे आहे. भारताची आर्थिक ताकद झपाट्याने वाढत आहे.तरुण लोकसंख्याशास्त्राचा लाभ आणि तंत्रज्ञान नेतृत्वाचा आपल्याला फायदा आहे.विद्यार्थ्यांनी सतत नवनवीन गोष्टी शिकायला हव्यात,तसेच जागतिक स्तरावर विचार करणे,नैतिकता आणि सचोटीने कार्य करणे,अस्थिर व असुविधाजनक परिस्थितीशी देखील जुळवून घेणे आणि आपले मानसिक आरोग्य चांगले राखणे हे विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महत्त्वाचे ठरेल.

एनएचआरडीएन चे सरसंचालक डॉ.धनंजय सिंग म्हणाले की, एनएचआरडएन चेे आता इंडसर्च कॅम्पससह 55 चॅप्टर्स आहेत. मनुष्यबळ विकास (एचआर) हा एक जागतिक व्यवसाय आहे.जगभरात आम्ही पाठविलेला सक्षमतेचा आराखडा (कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क) व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. याचा गाभा कार्यात्मक क्षमता नसून वर्तणूक क्षमता आहे.

एनएचआरडी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष अमन राजाबली यांनी स्वागतपर भाषण केले आणि विद्यार्थ्यांनी शक्य तेवढ्या संधी मिळविल्या पाहिजे असा सल्ला दिला.

इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी म्हणाले की,स्टुडंट चॅप्टर हा कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो आणि आमच्या कॅम्पसमध्ये एनएचआरडीएन स्टुडंट चॅप्टरची स्थापना होणे ही अभिमानाची बाब आहे.

इंडसर्चच्या संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर म्हणाल्या की, हा टप्पा म्हणजे आमच्या सर्वांसाठी नवी सुरूवात व नवीन गोष्टी शिकण्याची संधी आहे. एनएचआरडी बरोबर भागीदारी करून विद्यार्थ्यांना उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधण्याची अनोखी संधी मिळेल आणि सर्वांगीण विकासासाठी मदत होईल.हा चॅप्टर म्हणजे पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचारांची देवाण-घेवाण, व्यावहारिक ज्ञान आणि सहयोगासाठी योग्य व्यासपीठ आहे.

उद्घाटन समारंभानंतर कार्यक्रमाच्या संकल्पनेवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये नॉर ब्रेमसे सिस्टिम्स फॉर कमर्शियल व्हेईकल्स इंडियाचे मनुष्यबळ विभाग प्रमुख रोहिणी देशमुख,टाटा मोटर्सच्या टॅलेंट ॲन्ड कल्चर ट्रान्सफॉर्मेशन विभागाच्या प्रमुख संपदा ईनामदार,टेक महिंद्राच्या एम्लॉई रिलेशन्स विभागाचे प्रमुख राजेंद्र केंभवी,वँडेरलँडच्या वरिष्ठ उपाध्यक्ष मनिषा मुळे यांनी सहभाग घेतला.सोशल मिडियाचा मनुष्यबळ विकासावर होणारा परिणाम यावर त्यांनी अंर्तदृष्टी प्रदान केली आणि आपले अनुभव सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments