Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूनावाला फिनकॉर्प कंपनीत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन ...

पूनावाला फिनकॉर्प कंपनीत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन कंपनीतील कामकाजांत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाणार

पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड ही बँकिंग क्षेत्राशी असंलग्न वित्तीयसेवा कंपनी असून, सायरस पूनावाला ग्रुपची निर्मिती आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीतील मानव संसाधन विभागातील योजनानिहाय व्यावसायिक कामे आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पार पाडली जातील. कंपनीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचा निर्णय हा व्यवसायाशी निगडित कार्यपद्धतीतील मानांकनांमध्ये बदल घडविण्यासाठी पहिले पाऊल गणले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वित्तीय सेवा क्षेत्रात नावीन्यतापूर्वक बदल घडविता येईल, असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कपिल यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, ‘‘यंदाचे वर्ष पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडसाठी क्रांतिकारी वर्ष ठरले आहे. कंपनीच्या सक्षम पुढाकारातून ग्राहककेंद्रित व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे. यशस्वी उद्योगाकरिता आपल्या टीमची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे असते. ही कार्यक्षमता वाढत राहावी, यासाठीही आमचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही उद्योगधंद्याच्या भरभराटीसाठी नवनव्या क्षेत्रात पुढाकार घेत आहोत, त्याकरिता उत्पादनाशी निगडित वितरण जाळे वाढविणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही कंपनीच्या व्यवहारात डिजिटल बदल घडवत, मानव संसाधन विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा निर्णय घेतला. या डिजिटल नावीन्यतेचा वापर करुन परिपूर्ण ग्राहकसेवा देणे, उद्योग व्यवसायात वाढ करणे या घटकांवर भर दिला जाईल.’’

मानव संसाधन विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता खास वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीसह वापरली जाईल. कामकाजात वेग वाढविता यावा, याकरिता गरजेयुक्त व्यावसायिक मानवी संवाद घडेल, अशी प्रक्रिया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने राबविली जाईल. याकरिता खालील घटकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली कार्यरत राहील –

० योग्य उमेदवाराची जलद निवड करण्याकरिता –

नोकरीसाठी असंख्य उमेदवारांचे अर्ज येतात. प्रत्येक अर्ज वाचणे हे मानव संसाधन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेळखर्चिक काम असते. आपल्या कंपनीतील आवश्यक पदासाठी अचूक अर्ज शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल. परिणामी, कंपनीतील मुख्य अधिकाऱ्यांना अल्प काळात योग्य उमेदावार निवडता येईल.

० तत्काळ कागदपत्रांची तपासणी –

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन उमेदवाराची कागदपत्रे सहज तपासता येतील. त्यामुळे वेळेची बचत होईल. परिणामी, पुढील प्रक्रिया पार पाडणे सोप्पे होईल. या प्रक्रियेचा अवलंब केल्याने मानवी चुका टाळता येणे शक्य झाले आहे. अल्पकाळात कागदपत्र तपासणी होत असल्याने पदांसाठी तातडीने नियुक्ती करण्यास मदत होईल.

० उमेदवारांची जाचपडताळणी –

कृत्रिम बुद्धिमत्ता कागदपत्र तपासणीत महत्त्वाचे कार्य पार पडते. उमेदवारांच्या मुलाखतीसाठी कंपनीतील अधिकाऱ्यांचा कस पणाला लागतो. त्याकरिता अगोदरच सर्व जाचप्रक्रिया कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीतून उत्तमरीत्या पार पाडली जात आहे. मुलाखतीसाठी अधिकाऱ्यांना योग्यरीत्या लक्ष केंद्रित करता येत असल्याने विविध पदांवरील नियुक्त्या जलद आणि तत्परतेने केल्या जातात.

० कृत्रिम बुद्धिमत्तेतूनच होणार पदनिहाय नियुक्ती –

पदनिहाय रिक्त जागांच्या यादी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केली जाईल. त्यानुसारच नियुक्ती प्रक्रिया राबविली जाईल. कंपनीतील अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासणी, तसेच इतर कामकाजांत अतिरिक्त भार पडणार नाही, याची काळजी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीत घेतली जाईल. ज्या उमेदवाराचे अर्ज कंपनीतील आवश्यक पदाकरिता मिळतेजुळते असेल, त्या उमेदवाराची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना पोहोचविण्याचे कामही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली करेल.

० योग्य उमेदवार निवडप्रक्रिया सहजरीत्या घडेल –

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली स्वतःहून उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव आदी संबंधित घटक तपासते. ही प्रक्रिया सुलभ होत असल्याने निवड प्रक्रिया तत्काळ राबवत पदभरती करणे कंपनीतील अधिकाऱ्यांना डोईजड राहणार नाही.

नवनियुक्त्यांसह कंपनीतील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे, त्यांची इत्यंभूत माहिती अपडेट करणे आदी कामांकरिताही आता कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाईल. कंपनीतील मानव संसाधन विभागाकडून व्हॉट्सॲप या समाजमाध्यमाच्या साहाय्याने एआय बोट प्रणाली विकसित केली जाईल. या प्रणालीत कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड केली जाईल. कंपनीतील कर्मचाऱ्यांशी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संवाद साधला जाईल. कंपनीतील गरजू कर्मचाऱ्याला आवश्यक असलेली मदत तत्काळ पुरविणे, कंपनीतील योजनांविषयी वेळेवर माहिती उपलब्ध करुन देणे, एखाद्या कर्मचाऱ्याची सुट्टी मंजूर करणे, तसेच पगाराबाबत माहितीही या प्रणालीवर उपलब्ध केली जाईल. मुळात, कर्मचाऱ्यांच्या निवडक प्रक्रियेतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर होत उमेदवारांचे तांत्रिक, तसेच बौद्धिक कौशल्य तपासणी प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रणालीच्या वापराने निवड प्रक्रियेचा निर्णय सुलभरीत्या पार पडेल, असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या वापरासाठी कंपनीने आयआयटी मुंबईशी भागीदारी केली आहे. या भागीदारीबद्दल आयआयटी मुंबईच्या कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग विभागाच्या डॉ.पुष्पक भट्टाचार्य यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘‘वित्तीय सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने क्रांतिकारी बदल घडू लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कौशल्यपूर्वक वापरासाठी आता पूनावाला फिनकॉर्प कंपनी सज्ज आहे. या भागीदारीतून उद्योग व्यवसायातील समूळ प्रक्रिया तत्काळ राबविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा, ही माहिती पुरविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सद्यस्थितीत कंपनीतील मानव संसाधन विभागाशी निगडित प्रक्रियांमध्ये कृत्रिम प्रणाली कशी राबविता येईल, यावर काम सुरु आहे. कालांतराने इतर विभागांतही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली राबविण्यासाठी आखणी केली जाईल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments