*ठाणे,दि.26(जिमाका):-* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावातील अबादी क्षेत्रातील घरांसाठी सनद व मालमत्ता पत्रक, देणे हा आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.
दि.27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वामित्व” योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता पत्रकाचे/ सनदेचे ई-वितरण सुरु होणार असून ते या योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमांद्वारे सनदेचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.
त्यानुसार स्वामित्व योजनेचे लाभ सर्वात महत्वाच्या व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिनस्त असलेले तालुका ठाणे, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ मधील एकूण 43 गावात स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता संबधित गावांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, असे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक बाबासाहेब रेडेकर यांनी कळविले आहे.
00000
दि.27 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन*
RELATED ARTICLES


