Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedगॅलॅक्‍सी एस२४ सिरीजची भारतात उत्तम सुरूवात; तीन दिवसांमध्‍ये विक्रमी २५०,००० प्री-बुकिंग्‍जचा टप्‍पा...

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजची भारतात उत्तम सुरूवात; तीन दिवसांमध्‍ये विक्रमी २५०,००० प्री-बुकिंग्‍जचा टप्‍पा गाठला

गुरूग्राम, भारत – जानेवारी २२, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने आज घोषणा केली की, नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या त्‍यांच्‍या फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजने विक्रमी प्री-बुकिंग्‍जचा टप्‍पा गाठला आहे, ज्‍यामुळे ही आतापर्यंतची सर्वात यशस्‍वी एस सिरीज ठरली आहे. भारतातील २५०,००० हून अधिक ग्राहकांनी तीन दिवसांपूर्वी १८ जानेवारी रोजी देशामध्‍ये प्री-बुकिंग्‍जना सुरूवात झाल्‍यापासून गॅलॅक्‍सी एस२४ स्‍मार्टफोन ऑर्डर केले आहेत. तुलनेत, सॅमसंगने भारतात तीन आठवड्याच्‍या कालावधीत गॅलॅक्‍सी एस२३ सिरीजसाठी २५०,००० प्री-बुकिंग्‍जचा टप्‍पा सुनिश्चित केला होता.

 

”गॅलॅक्‍सी एआयद्वारे समर्थित गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज मोबाइल क्रांतीच्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश करते आणि ग्राहकांना नवीन शक्‍यतांचा उलगडा करण्‍यासाठी एआय शक्‍तीचा अनुभव देते. गॅलॅक्‍सी एस२४ सह ग्राहक संवादामध्‍ये येणाऱ्या अडथळ्यांना दूर करू शकतात आणि दैनंदिन जीवन अधिक सक्षम करण्‍यासाठी उत्‍पादकता व सर्जनशीलतेमध्‍ये वाढ करू शकतात. गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजच्‍या मोठ्या यशामधून निदर्शनास येते की, भारतीय ग्राहक नवीन तंत्रज्ञानाचा लवकर अवलंब करत आहेत. मी गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजला दिलेल्‍या उत्‍स्फूर्त प्रतिसादासाठी ग्राहकांचे आभार व्‍यक्‍त करतो,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

 

‘मेड इन इंडिया’ गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२४+ आणि गॅलॅक्‍सी एस२४ स्‍मार्टफोन्‍स लाइव्‍ह ट्रान्‍सलेट, इंटरप्रीटर, चॅट असिस्‍ट, नोट असिस्‍ट व ट्रान्स्क्रिप्‍ट असिस्‍ट वैशिष्‍ट्यांसह फोनची सर्वात मुलभूत भूमिका म्‍हणजेच संवाद वाढवण्‍यासह नव्‍या उंचीवर नेतात. सॅमसंग कीबोर्डमध्‍ये निर्माण करण्‍यात आलेले एआय देखील रिअल-टाइममध्‍ये हिंदीसह १३ भाषांमध्‍ये मेसेजेस् भाषांतरित करू शकते. कारमध्‍ये अँड्रॉईड ऑटो आपोआपपणे इनकमिंग मेसेजेसचा सारांश देईल आणि संबंधित प्रतिक्रिया व कृतींबाबत सल्‍ला देईल.

 

गॅलॅक्‍सी एस२४ सर्च हिस्‍ट्रीमधील मैलाचा दगड आहे, जेथे हा गुगलसह सर्वोत्तम, गेस्‍चर-संचालित सर्कल टू सर्च असलेला पहिला फोन आहे. वापरकर्ते उपयुक्‍त, उच्‍च दर्जाची सर्च निष्‍पत्ती पाहण्‍यासाठी गॅलॅक्‍सी एस२४ च्‍या स्क्रिनवर सर्कल, हाइलाइट, स्क्रिबल ऑन किंवा टॅप करू शकतात. विशिष्‍ट सर्चेससाठी जनरेटिव्‍ह एआय-समर्थित ओव्‍हरव्हृयूज उपयुक्‍त माहिती आणि वेबमधून घेण्‍यात आलेले संदर्भ प्रदान करू शकतात.

 

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमधील प्रोव्हिज्‍युअल इंजिन एआय-समर्थित टूल्‍सचे सर्वसमावेशक सूट आहे, जे फोटो कॅप्‍चर करण्‍याच्‍या क्षमतेमध्‍ये परिवर्तन करते आणि सर्जनशीलता वाढवते. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामधील क्‍वॉड टेलि सिस्‍टम नवीन ५x ऑप्टिकल झूम लेन्‍ससह येते, जी ५० मेगापिक्‍सल सेन्‍सरसोबत काम करते आणि २x, ३x, ५x ते १०x पर्यंतच्‍या झूम लेव्‍हल्‍समध्‍ये ऑप्टिकल-क्‍वॉलिटी परफॉर्मन्‍सची खात्री देते. याचे श्रेय अॅडप्टिव्‍ह पिक्‍सल सेन्‍सरला जाते. सुधारित डिजिटल झूमसह फोटो १००x मध्‍ये अत्‍यंत सुस्‍पष्‍ट दिसतात.

 

अपग्रेडेट नाइटोग्राफी क्षमतांसह गॅलॅक्‍सी एस२४ स्‍पेस झूमवर कॅप्‍चर करण्‍यात आलेले फोटोज व व्हिडिओज कोणत्‍याही स्थितींमध्‍ये, तसेच झूम केल्‍यानंतर देखील आकर्षक व सुस्‍पष्‍ट दिसतात. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्राचे मोठे पिक्‍सल आकार आता १.४ μm असून ६० टक्‍के मोठे आहे, ज्‍यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटोज कॅप्‍चर करता येतात. व्‍यापक ऑप्टिकल इमेज स्‍टेबि‍लायझर (ओआयएस) अँगल्‍स आणि सुधारित हँड-शेक कम्‍पेन्‍सेशन ब्‍लरिंग कमी करण्‍यास मदत करतात. फ्रण्‍ट व रिअर कॅमेऱ्यांमध्‍ये आवाज कमी करण्‍यासाठी डेडिकेटेड आयएसपी ब्‍लॉक आहे.

 

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमधील गॅलॅक्‍सी एआय एडिटिंग टूल्‍स इरेज, रि-कम्‍पोज व रिमास्‍टर यांसारख्‍या सोप्‍या एडिट्सची सुविधा देतात. एडिट सजेशन गॅलॅक्‍सी एआयचा वापर करत प्रत्‍येक फोटोसाठी परिपूर्ण योग्‍य ट्विक्‍सचा सल्‍ला देते, तर जनरेटिव्‍ह एडिट जनरेटिव्‍ह एआयच्या माध्‍यमातून फोटोच्‍या पार्श्‍वभूमीला अधिक आकर्षक करू शकते. कोणत्‍याही वेळी गॅलॅक्‍सी एस२४ फोटो अधिक आकर्षक करण्‍यासाठी जनरेटिव्‍ह एआयचा वापर करू शकतो, तसेच फोटोवर आणि मेटाडेटामध्‍ये वॉटरमार्क दिसेल.

 

नवीन इन्‍स्‍टण्‍ट स्‍लो-मो अधिक सविस्‍तरपणे गोष्‍टी दिसण्‍याकरिता अॅक्‍शन-पॅक क्षणांना अधिक स्‍लो करण्‍यासाठी हालचालींवर आधारित अतिरिक्‍त फ्रेम्‍सची निर्मिती करू शकते. सुपर एचडीआर शेटर प्रेस करण्‍यापूर्वी वास्‍तविक प्रीव्‍ह्यूजचा अनुभव देते.

 

गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये गॅलॅक्‍सीसाठी स्‍नॅपड्रॅगन® ८ जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्म आहे, जे अविश्‍वसनीय कार्यक्षम एआय प्रोसेसिंगकरिता उल्‍लेखनीय सुधारित एनपीयू देते. तिन्‍ही गॅलॅक्‍सी एस२४ मॉडेल्‍समध्‍ये १-१२० हर्टझ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट्स परफॉर्मन्‍स कार्यक्षमतेमध्‍ये सुधारणा करतात.

 

गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा १.९ पट मोठ्या वेपर चेम्‍बरसह येतो, जो डिवाईसच्‍या पृष्‍ठभागावरील तापमान सुधारण्‍यासह शाश्‍वत परफॉर्मन्‍स पॉवर देखील वाढवतो. रे ट्रेसिंग उच्‍च दर्जाच्‍या कॉन्‍ट्रॅस्‍ट व रिफ्लेक्‍शन इफेस्‍टसह वास्‍तविक व्हिज्‍युअज्‍स देते. गॅलॅक्‍सी एस२४ २६०० नीट सर्वोच्‍च ब्राइटनेस देतो, ज्‍यामुळे हा आतापर्यंतच्‍या ब्राइटेस्‍ट गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन आहे. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामधील कॉर्निंग® गोरिला® आर्मर उच्‍च दर्जाच्‍या टिकाऊपणासाठी ऑप्टिकली सुधारण्‍यात आले आहे.

 

गॅलॅक्‍सी एस२४+ मध्‍ये ६.७ इंच डिस्‍प्‍ले आहे आणि गॅलॅक्‍सी एस२४ मध्‍ये ६.२ इंच डिस्‍प्‍ले आहे. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये ६.८ इंच फ्लॅटर डिस्‍प्‍ले आहे, जे व्‍युईंगसह उत्‍पादकतेसाठी सानुकूल करण्‍यात आले आहे. गॅलॅक्‍सी एस२४+ आता गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रामध्‍ये दिसण्‍यात येणारे क्‍यूएचडी+ आहे. गॅलॅक्‍सी एस२४ अल्‍ट्रा टायटॅनियम फ्रेम असलेला पहिला गॅलॅक्‍सी फोन आहे, ज्‍यामुळे डिवाईसच्‍या दीर्घकाळ टिकाऊपणामध्‍ये अधिक वाढ होते.

 

गॅलॅक्‍सी एस२४ महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्‍यासाठी, तसेच एण्‍ड-टू-एण्‍ड सुरक्षित हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्‍शन आणि सहयोगात्‍मक प्रोटेक्‍शनसह असुरक्षिततेपासून संरक्षण करण्‍यासाठी सॅमसंग नॉक्सद्वारे सुरक्षित आहे. गॅलॅक्‍सी एस२४ वापरकर्त्‍यांना अडवान्‍स्‍ड इंटेलिजन्‍स सेटिंग्‍जच्‍या माध्‍यमातून एआय अनुभव वाढवण्‍यासाठी त्‍यांच्‍या डेटावर पूर्णत: नियंत्रण ठेवता येते, जे एआय वैशिष्‍ट्यांसाठी डेटाचे ऑनलाइन प्रोसेसिंग अक्षम करू शकते.

 

गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज उत्‍पादन जीवनचक्र वाढवण्‍याप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक पुढे घेऊन जाते, जेथे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या गॅलॅक्‍सी डिवाईसेची सानुकूल कार्यक्षमता दीर्घकाळापर्यंत अनुभवण्‍यास मदत करण्‍यासाठी ओएस अपग्रेड्सच्‍या सात जनरेशन्‍स आणि सात वर्षांपर्यंत सिक्‍युरिटी अपग्रेड्स प्रदान करण्‍यात आले आहेत.

 

Price and Availability

 

Specifications

 

Ram Storage

 

Colours

 

MOP (INR)

 

Galaxy S24

 

8GB 256GB

 

Amber Yellow, Cobalt Violet, Onyx Black

 

79,999

 

8GB 512GB

 

89,999

 

Galaxy S24+

 

12GB 256GB

 

Cobalt Violet, Onyx Black

 

99,999

 

12GB 512GB

 

109,999

 

Galaxy S24 Ultra

 

12GB 256GB

 

Titanium Gray, Titanium Violet, Titanium Black

 

129,999

 

12GB 512GB

 

139,999

 

12GB 1TB

 

Titanium Gray

 

159,999

 

 

 

Prebook Offers

 

Customers pre-booking Galaxy S24 Ultra & Galaxy S24+ will get benefits worth INR 22,000 and those pre-booking Galaxy S24 will get benefits worth INR 15,000.

 

Specifications

 

Offers

 

No Cost EMI

 

 

 

“Benefits worth INR 22K”

 

Up to 11 months [Samsung Finance+]

 

 

 

 

 

Galaxy S24 Ultra

 

INR 12K Upgrade Bonus

 

&

 

+

 

Galaxy S24+

 

INR 10K Storage Upgrade (Pre-book 256GB and Get 512GB)

 

 

 

Alternatively, INR 5K Bank Cashback can be availed along with INR 5K Upgrade [Total Benefits 10K]

 

 

 

 

 

 

 

Galaxy S24

 

“Benefits worth INR 15K”

 

Up to 11 months [Samsung Finance+]

 

 

 

 

INR 15K Upgrade Bonus

 

Alternatively, INR 5K Bank Cashback can be availed along with INR 8K Upgrade [Total Benefits 13K]

 

 

 

Previous article
पुणे, दि. 23 : हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या पहिल्या राजगड किल्ल्याचा नकाशा (डिझाईन) वास्तूरचनाशास्त्राच्या दृष्टिने एक महान चमत्कार आहे. अत्युच्च उंचीवरील हा दुर्गम किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्रातील एक अजोड नमुना आहे, असे निरीक्षण गड-किल्ल्याचे अभ्यासक गणेश धालपे यांनी नोंदवले. त्यांनी राजगडावर तयार केलेल्या त्रिमितीय माहितीपटाचे प्रक्षेपण महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) वास्तूरचनाशास्त्राच्या विद्यार्थिनींसमोर केले. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या संस्कृती अध्यायन केंद्रातर्फे ‘गडांचा राजा.. राजांचा गड.. राजगड’ हा त्रिमितीय माहितीपट व त्यानिमित्ताने धालपे यांनी रायगडावरील किल्ल्याच्या बांधकामाची माहिती सांगितली. यावेळी बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर, प्रा. निनाद जोग, प्रा. सौरभ मराठे, महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या उमा जोशी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजगडावरील अर्ध्या तासांचा माहितीपट धालपे यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून तयार केला असून त्यासाठी त्यांना आनंद यात्रा पर्यटन संस्थेच्या उमेश धालपे, विजय सावंत, किरण हिंगे आणि शेखर फदाले यांचे सहाय्य मिळाले. राजगडावरील माहितीपटासाठी कृत्रीम बुध्दिमत्तेसह अन्य काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर धालपे व त्यांच्या सहकार्यांनी केला असून फिरती त्रिमितीय प्रणाली असणारा हा अनोखा प्रकल्प आहे. बीएनसीएतील संस्कृती अध्यायन केंद्रातर्फे धालपे यांना यापुढे सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. वैशाली लाटकर यांनी दिले. त्या म्हणाल्या की, राजगडसारखा दुर्गम किल्ला या त्रिमितीय चित्रपट पाहताना प्रत्यक्ष फिरून आल्याचा प्रत्यय येतो. तोरणा किल्ला जिंकल्यावर शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी असणाऱ्या राजगड या अजोड व अप्रतिम किल्ल्याची अत्यंत अवघड अशी तटबंदी अभ्यास करून बांधून काढली, असे धालपे यांनी सांगितले. ते म्हणाले की, किल्ले बांधणीसाठी लागणारे वास्तूरचनाशास्त्र भिन्न असून शत्रूला सहजासहजी आत शिरता न येण्याची, त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी लागणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना अत्यंत कल्पकतेने बांधावी लागते. राजगडासाठी शिवाजी महाराजांनी शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी तेथील संजीवनी माचीवर खास चिलखती (दुहेरी) तटबंदी बांधली होती. शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांतील माहिती नुसार पाणी पाहून त्यानुसार मग किल्ला बांधावा असा पहिला नियम घालून दिल्याचे धालपे यांनी सांगितले. त्यानुसार राजगड येथील बुरुज, दरवाजे, तळघरे, बंदूकीने मारा करण्यासाठी आरपार छिद्रे असणाऱ्या जांग्या, बाजारपेठा, मंदिर रचना याचे एक स्वतंत्र शास्त्रच असून वास्तूरचनेच्या अभ्यासासाठी राजगड हा एक अजोड किल्ला आहे. या बांधकामाची वास्तूरचना पाहिल्यावर शिवाजी महाराजांमधील आत्मविश्वासाची प्रचिती येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments