बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या ७०० हून अधिक लवकर डिलिव्‍हरीजसह विक्रम रचला

तारां कित Avatar

गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी ४, २०२५: सॅमसंगच्‍या बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी) येथील फ्लॅगशिप स्‍टोअरने डिवाईसेसच्‍या लवकर डिलिव्‍हरीला सुरूवात करण्‍यासाठी स्‍पेशल इव्‍हेण्टसह नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजच्‍या यशाला साजरे केले, जेथे ७०० हून अधिक स्‍मार्टफोन्‍स देण्‍यात आले. बहुप्रतिक्षित स्‍मार्टफोन सिरीजच्‍या प्री-ऑर्डर्ससाठी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर या विक्रमी डिलिव्‍हरीची नोंद झाली आहे.

सॅमसंग इंलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या एमएक्‍स डिव्हिजनचे कॉर्पोरेट कार्यकारी उपाध्‍यक्ष / विभागप्रमुख सून चोई व्‍यक्तिश: स्‍टोअरमध्‍ये उपस्थित होते. त्‍यांनी या सिरीजमधील स्‍मार्टफोन्‍स प्री-ऑर्डर केलेल्‍या काही ग्राहकांना गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेस दिले.

या भव्य इव्‍हेण्‍टमध्‍ये स्‍टोअरच्‍या पहिल्‍या वर्धापन दिनाला देखील साजरे करण्‍यात आले. हे स्‍टोअर अद्वितीय क्‍यूरेटेड अनुभव आणि वास्‍तविक जीवनातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॅमसंगच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन प्रीमियम उत्‍पादनांना दाखवण्‍यासाठी प्रसिद्ध आहे.

ग्राहकांच्‍या गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आणि सुलभ अनुभवाच्‍या खात्रीसाठी स्‍टोअरमध्‍ये समर्पित डेटा ट्रान्सफर झोन्‍स व डिवाईस एक्‍स्‍चेंज काऊंटर्ससोबत स्‍वादिष्‍ट फूड व बेव्‍हरेज व्‍यवस्‍था देखील आहेत. या उपक्रमाचा प्रत्‍येक ग्राहकाला अपवादात्‍मक सेवा देण्‍याचा मनसुबा होता, जेथे त्‍यांनी त्‍यांच्‍या नवीन गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेसची निवड केली.

सॅमसंग बीकेसी स्‍टोअरमध्‍ये गॅलॅक्‍सी एस२५ डिवाईसेस पिक-अप करण्‍यासाठी येणा-या ग्राहकांना कॉम्‍प्‍लीमेण्टरी सेवांचा आनंद मिळेल, जसे जेन-एआय स्‍मार्टफोन केस कस्‍टमायझेशन, समर्पित टेक एक्‍स्‍पर्टस् आणि अद्वितीय सेलिब्रेशन प्रोग्राम, ज्‍याचा ग्राहकांच्या शॉपिंग क्षणांना कॅप्‍चर करत स्‍पेशल बनवण्‍याचा मनसुबा आहे.

नवीन गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२५+ आणि गॅलॅक्‍सी एस२५ स्‍मार्टफोन्‍स असलेली गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज सॅमसंगची आतापर्यंतची डिझाइन करण्‍यात आलेली सर्वात प्रगत फ्लॅगशिप स्‍मार्टफोन सिरीज आहे, जी ‘खरे एआय सोबती’ आहे. ही सिरीज सॅमसंगचा नाविन्‍यतेचा वारसा आणि भारतातील व्‍यापक व विस्‍तारित होत असलेल्‍या ग्राहकवर्गाला एआय वितरित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या मिशनला अधिक दृढ करते.

गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज एआय एजंट्स आणि मल्‍टीमोडल क्षमतांना एकीकृत करत प्रत्‍येक टचपॉइण्‍टवर वापरकर्त्‍यांच्‍या परस्‍परसंवाद साधण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल करते. गॅलॅक्‍सी चिपसेटसाठी अद्वितीय कस्‍टमाइज्‍ड स्‍नॅपड्रॅगन ८ एलाइट मोबाइल प्‍लॅटफॉर्म गॅलॅक्‍सी एआयसाठी उत्तम ऑन-डिवाईस प्रोसेसिंग पॉवर आणि गॅलॅक्‍सीच्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन प्रोव्हिज्‍युअल इंजिनसह उच्‍च दर्जाची कॅमेरा रेंज व कंट्रोल देते.

गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज ही पहिली सॅमसंग स्‍मार्टफोन सिरीज आहे, जिच्‍यामध्‍ये वन यूआय ७ सॅमसंगचा एआय-फर्स्‍ट प्‍लॅटफॉर्म आहे, जे सर्वोत्तम कंट्रोल्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. यामुळे एआय-पॉवर्ड वैयक्तिकृत मोबाइल अनुभव मिळतात. एआय एजंट्ससह मल्‍टीमोडल क्षमता गॅलॅक्‍सी एस२५ ला परस्‍परसंवादांसाठी मजकूर, स्‍पीच, इमेजेस् व व्हिडिओजचा अर्थ सांगण्‍यास सक्षम करतात, ज्‍यामुळे संवाद अधिक नैसर्गिकपणे होतो. गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजसह तुम्‍ही संदर्भ-केंद्रित सूचनांच्‍या माध्‍यमातून कृतीशील शोध घेऊ शकता.

नॉक्‍स व्‍हॉल्‍टच्‍या माध्‍यमातून सर्व वैयक्तिकृत डेटा खाजगी व सुरक्षित ठेवला जातो. गॅलॅक्‍सी एस२५ मध्‍ये पोस्‍ट-क्‍वॉन्‍टम क्रिप्‍टोग्राफी देखील आहे, जे उदयोन्‍मुख धोक्‍यांपासून वैयक्तिक डेटाचे संरक्षण करते. तसेच क्‍वॉन्‍टम कम्‍प्‍युटिंग विकसित होण्‍यासह या सुरक्षितेमध्‍ये अधिक वाढ होऊ शकते.

Tagged in :

तारां कित Avatar