Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्राचीन काळभैरवनाथ मंदिरात शाकंभरी पौर्णिमा निमित्त पालेभाज्या महोत्सव श्री बहिरोबा देव ट्रस्ट,...

प्राचीन काळभैरवनाथ मंदिरात शाकंभरी पौर्णिमा निमित्त पालेभाज्या महोत्सव श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन

पुणे : पुदिना, पालक, कोथिंबीर, अळू, कडीपत्ता, चाकवत, चुका,मुळा, मेथी राजगिरा, शेपू, लाल मुळा अशा विविध हिरव्यागार पालेभाज्यांची प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात सजावट करण्यात आली होती. पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त ही सजावट करण्यात आली. अंदाजे वजन ७० ते ८० किलो भाज्या यावेळी वापरण्यात आल्या.

 

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात पालेभाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.

 

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित पालेभाज्या महोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments