श्री विनोद ग्रोवर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कैझेंन इन्स्टिट्यूट (सैन ) एल.एल .पी यांच्या हस्ते उद्घाटन
· २२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शन उत्साहात सुरु
· दि. ०६ ते ०९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नवीन कृषी महाविद्यालय पटांगण, सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
· महाटेकचे हे २२ वे वर्ष असून ह्या प्रदर्शनात भारता मधून ५०० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून जवळपास २५,००० हून अधिक ग्राहकांनी भेट दिली.
· या प्रदर्शनात सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.
महाटेकच्या या चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन मशीन टूल्स, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशनव ऑटोमेशन इक्विपमेंट्स, फार्मा आणि सपोर्टिंग इंडस्ट्रीज मधील कॉर्पोरेट्स, लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध आहे. महाटेकच्या या प्रदर्शना मध्ये जवळपास ८०० ते १००० कोटींची उलाढाल होते.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री माननीय श्री. उदय सामंत, (महाराष्ट्र राज्य) म्हणाले की, महाटेक हे फक्त्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील मोठे एक्स्पो आहे . महाटेकला भेट दिल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक्स्पो पाहिल्यासारखे वाटते. महाटेकचा अनेक उद्योजकांना फायदा होईल याची मला नक्की खात्री आहे.
या प्रदर्शनासाठी ऑल इंडिया असोसियेशन ऑफ इंडस्ट्रीस , COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन), मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीस (गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा), गोकुळ शिरगाव मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, मध्यप्रदेश क्स` यांचे सहकार्य लाभले आहे.
महाटेकचे विशेष प्रायोजक :
• प्लॅटिनम प्रायोजक : एक्स्सेल एनक्लोषर,
• इंडस्ट्रियल एजुकेशन पार्ट्नर: एम. आय. टी स्कूल ऑफ डिस्टेन्स एजुकेशन
हे प्रदर्शन,औद्योगिक उत्पादने आणि सेवांचा ग्राहकांपर्यंत प्रचार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम ठरले आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी, यांनी, त्यांच्या अनोख्या प्रकाशनाच्या पायाभरणीसह, औद्योगिक व्यापार मेळावे आणि तांत्रिक परिषदांचे क्षेत्र सुव्यवस्थित करण्यासाठी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना मराठे इन्फोटेक प्रा. ली च्या डिरेक्टर गौरी मराठे म्हणाल्या, आम्ही महाटेक मधील प्रदर्शकांसाठीच व्हेंडर डेव्हलपमेंट मीट आयोजित केली होती. या संवादात्मक व्यासपीठामुळे OEM खरेदीदार आणि SME पुरवठादार यांच्यातील संवाद सुलभ करण्यास मदत झाली. अल्फा लावल इंडिया लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड, थरमॅक्स बॅबकॉक्स अँड विलकॉक्स एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड, टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांसारखे प्रख्यात OEM या कार्यक्रमाचा भाग होत्या.
याविषयी अधिक माहिती देताना मराठे इन्फोटेक प्रा. ली चे डिरेक्टर सुमुख मराठे म्हणाले, “उत्पादन क्षेत्राला योग्य व्यासपीठ देऊन त्यांच्या वाढीला चालना देणे हे महाटेकचे ध्येय आहे. अनेक मोठ्या औद्योगिक उद्योजकांनी त्यांच्या उत्पादन आणि खरेदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाटेक २०२५ ला भेट दिली.