Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुलींनी राजकारणाचा विचार करियर म्हणून केला पाहिजे सुनील...

मुलींनी राजकारणाचा विचार करियर म्हणून केला पाहिजे सुनील देवधर यांचे मत ः शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे यांच्यावतीने राजमाता जिजाबाई जयंती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे ः भारतात महिला प्रत्येक क्षेत्रात खूप पुढे जात आहेत. परंतु राजकारणात तितक्या प्रमाणात सक्रिय दिसत नाहीत. मुलींनी आता राजकारणाकडे एक करियर म्हणून पाहिले पाहिजे आणि देशाची पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिली पाहिजेत. महिलांसाठी राजकारणात येण्याच्या अनेक संधी सरकार आता उपलब्ध करून देत आहे. व्यावसायिक, लष्कर, राजकारण किंवा कोणत्याही क्षेत्रातील येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा मुलींनी घेत पुढे गेले पाहिजे, असे मत माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

 

ऐतिहासिक लालमहाल येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे च्यावतीने राजमाता जिजाबाई जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे उपस्थित होते. यावेळी प्रबोधिनीच्या महिला सेवाव्रती शाहीरा व विद्यार्थीनी सानवी मोरे हीने पोवाड्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स प्रशालेच्या विद्यार्थींनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. सुलोचना माने , अक्षदा इनामदार , सक्षम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

सुनील देवधर म्हणाले, मुलींना पुढे जाण्याच्या जशा अनेक संधी आहेत तसे धोके देखील आहेत. त्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे व्यसनाधिनता हा आहे. व्यसनाधीन स्त्री अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई किंवा जिजाऊ होऊ शकत नाही, असे ही त्यांनी सांगितले.

 

मोहन शेटे म्हणाले, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लढण्याचे, संघर्ष करायचे, पराक्रमाचे संस्कार केले. जिजाऊंनी शिवबाला त्यांच्या जीवनाचे प्रयोजन सांगितले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले ते साकार केले. तसेच तुम्ही देखील तुमच्या जगण्याचे प्रयोजन शोधा. मोठी स्वप्न पहा आणि ती साकार करण्यासाठी धडपड करा, असेही त्यांनी सांगितले. प्रा.संगीता मावळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. मृणालिनी दुसाने यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments