शिवजयंतीनिमित्त टिळक रोड वरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात आली. शाळेतील अवघ्या चार वर्षाचा मुलगा चि. माणिकराव प्रतिक मोहिते या विद्यार्थ्यांने सहजपणे लाठीकाठी, तलवारबाजी, धनुष्यबाणाचे प्रात्यक्षिक सादर केले. तर गंधर्व निर्मल या विद्यार्थ्याने शिवगर्जना म्हटली. या निमित्ताने मुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत आली होती. रोहिडेश्वराची शपथ या प्रसंगावर नाटिका सादर करण्यात आली. हा उपक्रम माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून उत्साहात पार पडला.
शिवजयंती निमित्त मुरलीधर लोहिया मातृ मंदिर येथे लाठीकाठी, तलवारबाजी, धनुष्यबाण प्रात्यक्षिके
RELATED ARTICLES


