एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे येथे दि. 20,21,22 फेब्रुवारी रोजी दु. 3 ते 5 या वेळेत मधुमेहाच्या रुग्णांसाठी “विनामूल्य डायबेटिक नेफ्रोपॅथी तपासणी व सल्ला शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये तज्ञ फिजिशियन व नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला विनामूल्य असेल. तसेच निदानासाठी आवश्यक तपासण्या 50% सवलतीत केल्या जाणार आहेत.
मधुमेहामुळे ज्यावेळी मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो त्यावेळी त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात, यात मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या आणि पेशी क्षतिग्रस्त होतात. उच्च मधुमेहाच्या जोडीला रुग्णाला उच्च रक्तदाब असल्यास हा धोका आणखी वाढतो. यासाठी वेळीच निदान करून यावर उपचार घेणे गरजेचे असते.
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे -संपर्क – 020-67029100


