भारत, फेब्रुवारी १९, २०२५: जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क आणि आघाडीचे बी२बी अॅडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म लिंक्डइन ने केलेल्या नवीन संशोधनाच्या मते, बी२बी मार्केटर्ससाठी दबाव वाढत आहे, जेथे भारतातील जवळपास निम्म्या मार्केटर्सना दर महिन्याला सी-सूट कार्यकारींना विपणन खर्चाचे कारण सांगावे लागते. बी२बी खरेदी चक्रांचे प्रमाण वाढत असताना बहुतांश (८९ टक्के) बी२बी मार्केटर्स म्हणतात की कॅम्पेनच्या दीर्घकालीन प्रभावाचे मापन करणे अधिक आव्हानात्मक होत आहे.
लिंक्डइनच्या नवीन ‘बी२बी आरओआय इम्पॅक्ट’ संशोधनामध्ये* यूएस, यूके, फ्रान्स आणि भारतातील १,००० हून अधिक बी२बी मार्केटर्सचे सर्वेक्षण करण्यात आले. या संशोधनामधून मार्केटर्सना कंपनी महसूलावरील त्यांच्या कामाचा प्रभाव दाखवण्यासाठी सामना करावा लागणारा दबाव दिसून येतो. देशातील ८४ टक्के बी२बी सीएमओ म्हणतात की गेल्या दोन वर्षांमध्ये कॅम्पेन रिटर्न-ऑन-इन्व्हेस्टमेंट (आरओआय) सिद्ध करून दाखवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.
या संशोधनामधून निदर्शनास येते की, बी२बी मार्केटर्सना आरओआय दाखवताना तीन प्रमुख अडथळ्यांचा सामना करावा लागतो – विशेषत: बी२बी कॅम्पेन्ससाठी प्रमाणीकृत उद्योग मापदंड व मेट्रिक्सचा अभाव (४२ टक्के); विशिष्ट कॅम्पेन्सना रूपांतरणांचे अचूक श्रेय देण्यामध्ये अडथळा (३९ टक्के); विविध डेटा प्लॅटफॉर्म्सदरम्यान एकीकरणाच्या समस्या (३९ टक्के) आणि विक्री व विपणनादरम्यान मेट्रिक्ससंदर्भात संस्थात्मक एकीकरणाचा अभाव (३८ टक्के).
भारतातील लिंक्डइन मार्केटिंग सोल्यूशन्सचे संचालक सचिन शर्मा म्हणाले, “२०२५ मध्ये भारतातील बी२बी मार्केटर्ससाठी आरओआय सिद्ध करणे प्रमुख प्राधान्य असताना वरिष्ठ प्रमुखांसोबतचे त्यांच्या संबंधावर अधिक फोकस असेल. १० पैकी ९ मार्केटर्स कॅम्पेन परताव्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आरओआयचे उत्तमप्रकारे मापन करण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहेत, ज्यामुळे बी२बी मार्केटर्सनी ‘आकारमान मेट्रिक्सपेक्षा मूल्य मेट्रिक्स’ला प्राधान्य देण्यासाठी प्रमुखांसोबत काम केले पाहिजे. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी योग्य एआय टूल्सचा अवलंब केला पाहिजे, जे कॅम्पेनचा प्रभाव अधिक अचूकतेसह मापन करण्यास मदत करू शकतात, परिणामत: व्यवसायामध्ये सर्वोत्तम निष्पत्ती मिळतील.”
बहुतांश बी२बी मार्केटर्स म्हणतात की मूल्य मेट्रिक्स हे कॅम्पेनच्या यशाचे प्रबळ सूचक आहेत
संशोधनामधून निदर्शनास येते की, आकारमान मेट्रिक्स जसे कस्टमर अॅक्विझिशन कॉस्ट (सीएसी), कॉस्ट पर एंगेजमेंट (सीपीई) आणि रिटर्न ऑन अॅड स्पेण्ड (आरओएएस) हे वरिष्ठ प्रमुखांकडून काही सर्वात वारंवार विनंती करण्यात येणारे मेट्रिक्स असले तरी बी२बी मार्केटर्सना मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे माहित आहे. डेटामधून निदर्शनास येते की, भारतातील ४६ टक्के वरिष्ठ प्रमुख आरओएएसवर लक्ष केंद्रित करत असले तरी बी२बी मार्केटर्स मार्केटिंग क्वॉलिफाईड लीड्स (एमक्यूएल) आणि सेल्स क्वॉलिफाईड लीड्स (एसक्यूएल) अशा मूल्य मेट्रिक्सना कॅम्पेनच्या यशाचे प्रबळ सूचक मानतात.
आगामी वर्षाकडे वाटचाल करत बी२बी मार्केटर्स म्हणतात की, खरेदीदाराची खरेदी करण्याची शक्यता असे खरेदीदाराचे हेतू समजून घेणे कॅम्पेनची परिणामकारकता सिद्ध करण्यामधील मोठे आव्हान असेल, ज्यामधून पात्र लीड्सचे प्रभावीपणे मापन करण्यामधील महत्त्व दिसून येते. परिणामत: अर्ध्याहून अधिक (५३ टक्के) मार्केटर्स खरेदी निर्णयावर प्रभाव पाडण्यासाठी आणि रूपांतरणाला चालना देण्यासाठी ग्राहक समूह विपणन धोरणाला प्राधान्य देत आहेत, तसेच रिपोर्टिंगमध्ये कस्टमर लाइफटाइम व्हॅल्यू (सीएलव्ही)वर लक्ष केंद्रित करत आहेत.
९६ टक्के बी२बी मार्केटर्सचा विश्वास आहे की, एआयचा मापनावर सकारात्मक प्रभाव पडेल
ग्राहक समूह विकसित होण्यासोबत बी२बी मार्केटर्सना योग्य निर्णय घेणे आणि कॅम्पेनची परिणामकारकता सुधारण्यामध्ये आव्हानांचा सामना करावा लागत आहे. असे असताना भारतातील १० पैकी ९ बी२बी मार्केटर्सचा विश्वास आहे की, पुढील पाच वर्षांमध्ये एआयचा मापनावर सकारात्मक प्रभाव पडेल.
तसेच, ९४ टक्के बी२बी मार्केटर्स देखील मान्य करतात की त्यांना कॅम्पेन्स डिझाइन व ऑप्टिमाइज करण्यासाठी एआयचा वापर करताना आरओआयमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. संशोधानामधून


