मुंबई, जानेवारी २५, २०२३ – घाटले गावातील भाजीपाला विक्रेत्याचा मुलगा रूतुराजने इंजीनिअरिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी आणि कुटुंबाला दारिद्र्याच्या विळख्यामधून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी सामाजिक-आर्थिक अडथळ्यांचा सामना करत त्यावर मात केली. या प्रवासामध्ये टाटा मोटर्सने त्याला यशाच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
या उल्लेखनीय यशामध्ये रूतुराजने महत्त्वाकांक्षा बाळगण्यास आपले स्वप्नवत करिअर घडवण्यासाठी आर्थिक अडचणी व सामाजिक अपेक्षांवर मात केली. त्याचे वडिल भाजीपाला विक्रीमधून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामधून कुटुंबाचा सांभाळ करत होते. अशा स्थितीत त्याचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हते आणि इयत्ता ९वी मध्ये शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. पण, त्याचवेळी त्याने त्याच्या शाळेमध्ये टाटा मोटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिमीडियल क्लासेसमध्ये नोंदणी केली, ज्यामुळे त्याला इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळाले. या पाठिंब्यासह रूतुराजने त्याच्या अभ्यासामध्ये सतत उत्तम कामगिरी केली आणि इंजीनिअरिंगमध्ये करिअर घडवले. धैर्य व निर्धारासह त्याने इंजीनिअरिंगमध्ये प्रोफेशनल कोर्स पूर्ण केला आणि आता चिपळूणमधील प्रख्यात बांधकाम कंपनीमध्ये असिस्टण्ट सिव्हिल इंजीनिअर म्हणून काम करत आहे.
रूतुराजच्या प्रवासाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, ”रूतुराजच्या यशोगाथेमधून दिसून येते की, शिक्षण सामाजिक प्रगतीसाठी शक्तिशाली साधन आहे आणि व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यामध्ये मदत करते. या प्रगतीदायी प्रवासामधून शिक्षण व संधींचा जीवनाला कलाटणी देणारा प्रभाव दिसून येतो. टाटा मोटर्समध्ये आम्ही वंचित पार्श्वभूमींमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहोत, ज्यासाठी त्यांना त्यांची स्वप्ने साकारण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान करतो. रूतुराजने सिव्हिल इंजीनिअर बनण्याचे त्याचे स्वप्न साकारत मिळवलेले यश पाहून आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्ही आशा करतो की, त्याचे यश इतरांना नीडरपणे स्वत:च्या महत्त्वाकांक्षा साकारण्यास प्रेरित करेल.”
रूतुराजने त्याच्या महत्त्वाकांक्षा साकारण्यास बहुमूल्य पाठिंबा देण्यासाठी टाटा मोटर्सचे मनापासून आभार मानले. टाटा मोटर्सच्या विद्याधनम सारख्या प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून कंपनी सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी प्रबळ स्रोत आहे. २०१३ पासून टाटा मोटर्स २०० हून अधिक सरकारी अनुदानित शाळांपर्यंत पोहोचली आहे, ज्याअंतर्गत सरकारी शाळांमधील २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत करण्यासाठी रिमीडियल क्लासेसची सुविधा दिली आहे. कोविड महामारीच्या प्रादुर्भावानंतर टाटा मोटर्स ९० हून अधिक शाळांमध्ये डिजिटल लर्निंग मोडच्या माध्यमातून हे रिमीडियल क्लासेस राबवत आहे, जेथे शिक्षक नियमित कालांतराने विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्या शंकांचे निरसन करतात.


