पुणे, 29 जानेवारी 2023 – गतिशील भारतीय बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत, पॅकेजिंग आणि प्रिंटिंगकरिता लागणारी शाई आणि कोटींगमधील जागतिक नेतृत्व असलेल्या Siegwerk च्या वतीने पुण्यात नवीन अत्याधुनिक कलर मॅचिंग सेंटरचे उदघाटन करून भारतात आपला कार्य विस्तार केला. एकूण 1200 टन वार्षिक उत्पादन क्षमता आणि अतिरिक्त 1350 टन व्यापार क्षमतेसह, नवीन सुविधा केंद्र महाराष्ट्रातील Siegwerk आपल्या वाढत्या ग्राहक संख्येची पूर्तता करेल. हे सेंटर ग्राहकांना कमी वेळेत इच्छित आणि ग्राहक मागणीनुरूप (कस्टमाइज्ड) शाईच्या छटा दाखवण्यास मदत करेल. तसेच पुण्यात अतिरिक्त रोजगार निर्मितीही शक्य होणार आहे.
हे नवीन रंग जुळणारे केंद्र एकूण 12,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेले आहे. याठिकाणी नवीन युगाचे तंत्रज्ञान आणि कोटींग (रंग आवरण) निर्मिती करण्यात येते. सेंटरचे व्यवस्थापन कुशल व्यवसायिकांद्वारे चालते. या सुविधा केंद्रामुळे Siegwerk ला अवघ्या 24 तासांत आपल्या ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविणे शक्य झाले.
पुणे येथे नवीन सुविधा केंद्राचे उदघाटन करताना Siegwerk India च्या फ्लेक्सीबल पॅकेजिंगकरिता बीयू हेड, श्री. अजय तायडे म्हणाले: “हा धोरणात्मक विस्तार स्थानिक आणि ग्राहक गरजांशी निगडीत उपायांद्वारे मजबूत भागीदारीला चालना देण्याच्या Siegwerk च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. Siegwerk चे अस्तित्व भारतात सातत्याने वाढत असून औद्योगिक केंद्र म्हणून पुणे नावारूपाला येते. हे नवीन सुविधा केंद्र Siegwerk साठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले, ज्यामुळे चैतन्यशील भारतीय मुद्रण उद्योगात सहकार्य, नवोन्मेष आणि वाढीचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. आमच्या ग्राहकांद्वारे गुणवत्तेशी तडजोड न करता त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे जलद गतीने साध्य करण्यासाठी या नवीन कलर मॅचिंग सेंटरचा लाभ घेतला जाऊ शकतो.”
Siegwerk India चे सीएफओ आणि बीयू हेड, नॅरो हेड श्री. अजित सिंह म्हणाले, “हे नवीन सुविधा केंद्र भारतीय विकास गाथेत गुंतवणूक करण्यासाठी, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या ग्राहकांच्या जवळ आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी, आमच्या ग्राहकांना आमच्यासोबतचा व्यवसाय करणे सुलभ व्हावे म्हणून Siegwerkची वचनबद्धता दर्शवते. उत्पादन सुरक्षिततेमध्ये ट्रेंडसेटर म्हणून, हे सुविधा केंद्र पूर्णपणे टोल्यून-मुक्त, खनिज तेल मुक्त आणि बेंझोफेनोन मुक्त असल्याची खातरजमा आम्ही केली.”
भिवंडी, राजस्थानमध्ये महत्त्वाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून आणि सर्व राज्यांमध्ये एक बळकट ग्राहक तळ तयार करत Siegwerk भारतात सन 2006 पासून कार्यरत आहे. कंपनीचे संपूर्ण भारतात 9 कलर मॅचिंग सेंटरचे विस्तृत जाळे आहे. Siegwerk पॅकेजिंग म्हणजेच बांधणीच्या दृष्टीने सुरक्षित आणि टिकाऊ शाई आणि कोटिंग्ज पर्याय प्रदान करते आणि एफएमसीजी, अन्नपदार्थ आणि पेयनिर्मिती, औषधनिर्मिती, तंबाखू, प्रिंट मीडिया इत्यादी उद्योगांमधील कन्व्हर्टर आणि ब्रँडसह
जवळून काम करते.


