Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedरंगावली प्रदर्शनातून अनुभवा 'भगवान जगन्नाथ' यांची चरित्र कथा श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन...

रंगावली प्रदर्शनातून अनुभवा ‘भगवान जगन्नाथ’ यांची चरित्र कथा श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन तर्फे भव्य रंगावली प्रदर्शन : दिनांक ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजन ; सर्वांना विनामूल्य प्रवेश

पुणे : महाप्रभू जगन्नाथजींची कथा आणि लीला रंगावलीच्या विविध संशोधनात्मक प्रकारांमधून पुण्यात कलारसिकांना अनुभविता येणार आहेत. श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन तर्फे ‘जय जगन्नाथ’ या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले असून तब्बल ८० रंगावली कलाकार यामाध्यमातून आपली रंगावली कला सादर करणार आहेत, अशी माहिती श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. अक्षय शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या ८० विद्यार्थ्यांनी ३० ते ३५ तास काम करत साकारलेल्या या प्रदर्शनात रांगोळीतील अनेक संशोधने आपल्याला पाहायला मिळतील. कायमस्वरूपी रांगोळी, २ इन १ रांगोळी, पाण्याखाली,पाण्यावर तसेच पाण्याच्या मधोमध रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, ३ डी रांगोळी यांसह सेलिंग ला केलेली रांगोळी, रेडिओ ऍक्टिव्ह रांगोळी, मूव्हिंग रांगोळी आदी प्रकारांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

 

या प्रदर्शनाचे उदघाटन दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ज्योतीषाचार्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी आणि भालोद येथील प. पू. शरदचंद्र प्रतापे महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथणे, श्रीहरी पवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

प्रदर्शनात एकूण ३२ रांगोळ्या आहेत. यामध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिर ची प्रतिकृती, जगन्नाथ पुरी येथील मंदिर कसे निर्माण झाले, त्यामागच्या अनेक रहस्य कथा, श्री जगन्नाथ जी कोण आहेत, ते कसे आले आणि त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी केलेल्या लीला रंगावलीतून मांडण्यात येणार आहेत. दिनांक ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात

आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments