दुष्परिणाम जंक फूडचे
दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी विज्ञान दिनानिमित्त विज्ञान मंडळ अंतर्गत “दुष्परिणाम जंक फूडचे” या विषयावर प्राध्यापक सुनील बबनराव अडसुळे यांचे व्याख्यान आयोजित केलेले होते.
अडसुळे सरांनी विद्यार्थिनींना जंकफूड म्हणजे काय? व त्याचे शरीरावर होणारे वाईट परिणाम सांगितले.जंक फूड सेवनामुळे ब्लड प्रेशर,डायबिटीस, हार्ट अटॅक यासारखे आजार कसे होतात हे PPT च्या माध्यमातून समजावून सांगितले. Preservative वापरलेले अन्नपदार्थ,कोल्ड्रिंक्स, अन्नपदार्थात वापरलेले रंग इ. पदार्थ खाल्ल्यास होणारे परिणाम,जंक फूड मध्ये वापरले जाणारे मीठ,साखर,मैदा, पामऑइल यांचे होणारे दुष्परिणाम,पॅक फूड मुळे शरीरावर होणारे वाईट परिणाम, कोल्ड्रिंक्समुळे दातांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यांची माहिती मुलींना देण्यात आली.
Health is more than wealth याचे महत्त्व सरांनी मुलींना समजावून सांगितले.तसेच रोजच्या आयुष्यात व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम करावा यासाठी प्रेरित करण्यात आले.शेवटी जंक फूड खाणार नाही याची विद्यार्थ्यांनी कडून प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अभ्यंकर दीपा यांनी विद्यार्थिनींना आपल्या आहाराचे व आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे व चांगली जीवन पद्धती अवलंबणे किती गरजेचे आहे हे सांगितले.
तसेच इयत्ता ५वीच्या विद्यार्थिनींनी बालगंधर्व कलादालनात भरवलेल्या दंतप्रदर्शनाला भेट दिली.या प्रदर्शनात मौखिक आणि दंत आरोग्य याचे महत्त्व विविध प्रकारच्या माहितीपूर्ण तक्त्यातून , दातांविषयी गमती-जमती तसेच दात घासण्याची योग्य पद्धत पपेट शो इत्यादी विविध माध्यमांमधून उलगडून सांगितले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा.मुख्याध्यापिका अभ्यंकर दीपा व सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


