जम्मू, २८ जानेवारी २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने टाटा मोटर्स ग्रुप कंपनी टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स (जेअॅण्डके) प्रा. लि.च्या माध्यमातून जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेडला अत्याधुनिक अल्ट्रा ईव्ही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस वितरित केल्याची घोषणा केली. जम्मू व काश्मीर सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाद्वारे नेतृत्वित उपक्रमाचा जम्मूमध्ये पर्यावरणदृष्ट्या शाश्वत सावर्जनिक परिवहन यंत्रणा स्थापित करण्याचा मनसुबा आहे. या उत्सर्जन-मुक्त टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसेस भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत निर्माण करण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसेसमध्ये प्रगत सुविधा आहेत, तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम्सची शक्ती आहे. या इलेक्ट्रिक बसेसची डिझाइन सुरक्षितता, आरामदायीपणा व सोईस्कर प्रवासाची खात्री देते, ज्यामुळे जम्मूमधील रहिवाशांना विश्वसनीय व शून्य-उत्सर्जन आंतरशहरीय प्रवासाचा अनुभव मिळेल. या इलेक्ट्रिक बसेसची डिलिव्हरी जम्मू व श्रीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी १२ वर्षांच्या कालावधीकरिता श्रीनगरमध्ये १०० इलेक्ट्रिक बसेस आणि जम्मूमध्ये १०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, देखरेख व कार्यसंचालन पाहण्याच्या मोठ्या ऑर्डरचा भाग आहे.
माननीय गृहमंत्री व सहकार मंत्री, भारत सरकार श्री. अमित शाह यांच्या हस्ते या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी माननीय अवजड उद्योग मंत्री, भारत सरकार डॉ. महेंद्र नाथ पांडे आणि जम्मू व काश्मीरचे माननीय लेफ्टनंट गव्हर्नर श्री. मनोज सिन्हा उपस्थित होते. तसेच प्रख्यात मान्यवरांनी उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली जसे माननीय खासदार श्री. जुगल किशोर शर्मा व गुलाम अली खताना, भारत सरकारचे गृह सचिव श्री. अजय भल्ला (आयएएस), जम्मू व काश्मीरचे मुख्य सचिव श्री. अटल डुल्लो (आयएएस), जम्मू व काश्मीरच्या एचअॅण्यूडीडीच्या आयुक्त सचिव श्रीमती मनदीप कौर (आयएएस), यांच्यासह जम्मू व काश्मीर सरकार,जम्मू महानगरपालिका, जम्मू स्मार्ट सिटी लि.चे इतर प्रशासकीय सचिव आणि प्रतिनिधी आणि टाटा मोटर्सचे प्रतिनिधी.
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत जम्मू स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल यादव (आयएएस) म्हणाले, ”जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड इलेक्ट्रिक बसेस सादर करण्यासह जम्मूमधील परिवहन सुधारण्याप्रती कटिबद्ध आहे. यामागे मास मोबिलिटी सुधारण्याचा, अधिक सुरक्षितता व शाश्वतता प्रदान करण्याचा, तसेच प्रवाशांना अधिक उपलब्धता व सोयीसुविधा देण्याचा मनसुबा आहे. या प्रगत बसेस प्रखर दर्जा मानकांची पूर्तता करण्यासह शहरातील हवेचा दर्जा सुधारण्याचा मनसुबा असलेल्या सामूहिक उपक्रमांप्रती योगदान देखील देतात. हिरवा झेंडा दाखवण्यात आलेली इलेक्ट्रिक बस कार्बन फूटप्रिंट कमी करण्याप्रती, तसेच नागरिकांचा जीवनाचा दर्जा सुधारण्याप्रती जम्मू स्मार्ट सिटीच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे.”
या महत्त्वपूर्ण प्रसंगी मत व्यक्त करत टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशन्स (जेअॅण्डके) प्रा. लि.चे अध्यक्ष श्री. आसिम कुमार मुखोपाध्याय म्हणाले, ”मला नुकतेच श्रीनगरमध्ये इलेक्ट्रिक बस कार्यसंचालनांना सुरूवात केल्यानंतर जम्मूमध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरु होताना पाहण्याचा आनंद होत आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात अग्रस्थानी असण्यासह सार्वजनिक परिवहनामधील प्रगत इनोव्हेशन्सना चालना देत आहे, जे विशेषत: भारतातील अद्वितीय गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सबाबत असलेले ज्ञान आम्हाला इतरांपेक्षा वरचढ ठरवते, जे सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या ध्येयाशी संलग्न आहे. इलेक्ट्रिक बसेस जम्मूच्या परिवहन यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण भर ठरतील, ज्यामुळे अनेक फायदे मिळतील, जे शहराच्या आरोग्य, पर्यावरण व आर्थिक ध्येयांशी संलग्न असतील. आम्ही जम्मूमधील सार्वजनिक परिवहनाच्या भविष्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक आहोत.”
टाटा मोटर्सने भारतातील इलेक्ट्रिक बस बाजारपेठेत प्रबळ उपस्थिती दर्शवली आहे, जेथे देशभरातील विविध शहरांमध्ये १,५०० वाहने वितरित केली आहेत. या बसेसनी ९५ टक्क्यांहून अधिक अपटाइमसह एकूण १० कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे, ज्यामधून त्यांची विश्वसनीयता व कार्यक्षमता दिसून येते. टाटा अल्ट्रा ईव्ही क्रांतिकारी ई-बस म्हणून अग्रस्थानी आहे, जी शहरी प्रवासाला नव्या उंचीवर घेऊन जाते. या बसमधील पूर्णत: इलेक्ट्रिक पॉवरट्रेन ऊर्जेचा वापर सानुकूल करते, ज्यामुळे इंधन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते आणि पर्यावरणावरील परिणाम कमी होतो. बस सुलभ बोर्डिग, आरामदायी आसन आणि ड्रायव्हर-अनुकूल कंट्रोल्स अशा वैशिष्ट्यांसह विनासायास प्रवास अनुभव देते, तसेच शून्य उत्सर्जनाची खात्री देते. अधिक सुरक्षिततेसाठी टाटा अल्ट्रा ईव्हीमध्ये प्रगत तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे, जसे इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, एअर सस्पेंशन, इंटेलिजण्ट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस) आणि पॅनिक बटन. शुद्ध व शाश्वत सार्वजनिक परिवहनाप्रती ही कटिबद्धता टाटा अल्ट्रा ईव्हीला शहरातील प्रवाशांच्या प्रवास गरजांसाठी योग्य सोल्यूशन ब
नवते.


