पुणे,29 जानेवारी 2024 : यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाला सुधारित कनेक्टिव्हिटी,आर्थिक वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकतेच्या भविष्याकडे नेण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,असे मत एजीस् इंडिया कन्सल्टींग इंजिनिअर्स प्रा.लि.च्या भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी व्यक्त केले. सहयोगी भावनेचा दीपस्तंभ असलेल्या गती शक्ती कार्यक्रमाने विविध मंत्रालयांचे एकत्रीकरण करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे.अर्थसंकल्पात अधिक निधीमुळे दळणवळण,उर्जा,शहरी नियोजन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. हा सर्वांगीण दृष्टीकोन समन्वय व कार्यक्षमतेला चालना देणारा व भारतातील पायाभूत सुविधांमधील अंतर भरून काढून प्रगतीचे अखंड नेटवर्क तयार करण्यासाठी आवश्यक आहे.


