Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे गोखले नगर येथे आयोजन*

पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे गोखले नगर येथे आयोजन*

 

पुणे, दि. ३१: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि स्वंयभु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद तुकाराम ओंबाळे मैदान गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर पुणे शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ५ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.

 

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार मार्ग, पुणे ०१ येथे संपर्क साधून उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments