Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसाय संधी या विषयावरील संवादात्मक सत्र पुण्यात संपन्न

पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसाय संधी या विषयावरील संवादात्मक सत्र पुण्यात संपन्न

 

पुणे, ३१ जानेवारी २०२४ : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कंपनी असलेल्या अराईज इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल प्लॅटफॉर्म (आयआयपी) यांच्या सहयोगाने पुण्यातील प्राईड हॉटेलमध्ये ‘पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधींवर संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अराईज आयआयपीचे सरव्यवस्थापक रीताब्रता भट्टाचार्य, अराईज आयआयपीच्या विपणन विभागाचे प्रमुख नागेश राणे, ग्रीनबॅक ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनीस थानावाला आणि फिक्कीच्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे संचालक दीपक मुखी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी अराईज आयआयपीच्या विपणन विभागाचे प्रमुख नागेश राणे म्हणाले की, आमचे उद्दिष्ट हे निर्यातदारांना आफ्रिकेकडे आकर्षित करून तेथे व्यवसाय स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे.कोविड पश्‍चातच्या काळात उद्भवणार्‍या भूराजकीय परिस्थितीमुळे आफ्रिकेमध्ये अनेक आर्थिक विकासाच्या संधी निर्माण झाल्या आहेत.एसीझेडमुळे कर आणि शुल्क संबंधित व्यावसायिकांना होणारे फायदे तसेच आशियाच्या तुलनेने पाश्‍चिमात्य देशांपर्यंत मालवाहतूकीसाठी कमी वेळ लागतो,तसेच मालवाहतूकीचा खर्च देखील वाचतो.शेतमाल प्रक्रिया उद्योगासारख्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कच्चा मालाची मुबलक उपलब्धता तसेच विशिष्ट प्रकारची उत्पादने आणि क्षेत्रासाठी खास कौशल्य विकास केंद्रे यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा आहे.याचा सकारात्मक परिणाम नफ्यावर देखील दिसून येतो.स्थिर राजकीय वातावरण असलेल्या आफ्रिकेतील देशांमध्ये अराईज कार्यरत आहे.सध्या आमचे कामकाज दहा अशा पार्क्समध्ये सुरू असून क्लस्टर हेड म्हणून याचे नेतृत्व करणारे सर्व भारतीयच आहेत.रस्ते,बंदरे आणि विमानतळांसारख्या मालवाहतूकीसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा या विकासाला चालना देत आहेत.

 

मनीस थानावाला यांनी आफ्रिकेमधील वित्त पुरवठ्याबाबत सादरीकरण केले.यंत्रसामग्रीसाठी वित्तपुरवठा,मुदत कर्ज,ईसीए निधी, खेळते भांडवल,वेअर हाऊस फायनान्सिंग इत्यादी विषयांबाबत संधी आणि आव्हाने यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

 

आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना फिक्कीच्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे संचालक दीपक मुखी म्हणाले की,या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आफ्रिका खंडातील दहा देशांमध्ये एसीझेड, इकोनॉमिक झोन्स यांमध्ये असलेली संधी आणि वित्त पुरवठ्याचे पर्याय याबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे.पाश्‍चिमात्य अर्थव्यवस्थांना,आव्हानांना सामना करावा लागत आहे.या पार्श्‍वभूमीवर आफ्रिका एक अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पर्यायाला भारत सरकारकडून देखील प्रोत्साहित केले जात आहे.निर्यात क्षमतेबरोबरच देशांतर्गत होत असलेला खप यामुळे आफ्रिका काही महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करत आहे. यामध्ये शेतमाल प्रक्रिया,ऑटोमोबाईल्स,फर्टिलायझर्स अ‍ॅन्ड केमिकल्स,इलेक्ट्रॉनिक्स, पॅकेजिंग,बांधकाम साहित्य,टिंबर पॅकेजिंग,पुनर्वापर उद्योग, औषध निर्माण,प्लॅस्टिक्स,कॉम्प्युटर असेंम्ब्ली आणि अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा समावेश आहे.भारत आणि आफ्रिका यांच्यातील व्यापार भागीदारी अधिक दृढ करण्याचा आणि उपलब्ध संधी लोकांपर्यंत पोहचवून सरकारच्या प्रयत्नांना पूरक बनण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.अशा व्यापार केंद्रित उपक्रमांचे फिक्की नेतृत्व करत आले आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments