*
पुणे, २ फेब्रुवारी २०२४ लोकविश्वास प्रतिष्ठान ही गोव्यातील दिव्यांग मुलांना प्रशिक्षण व पुनर्वसन करणारी अग्रणी संस्था आहे. या संस्थेतर्फे मूकबधिर, अंध, बौद्धिक दृष्ट्या कमकुवत मुलांना प्रशिक्षण दिले जाते व पुनर्वसन केले जाते. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे गीत रामायण महानाट्य होय.
अयोध्येत नुकतीच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि रामलल्लाला मनापासून अभिवादन करण्यासाठी संस्थेच्या दिव्यांग मुलांनी पुणेकरांसाठी गीत रामायणावर आधारित महानाट्य सादर करण्याचे ठरवले आहे. या महानाट्याचा *पहिला प्रयोग* *शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी* *२०२४ रोजी* *सिम्बॉयसिस ईशान्य भवन* *कॅम्पस, म्हाडा* *काॅलनी, विमाननगर पुणे*
*येथे सायंकाळी चार ते सात* *यावेळात होणार आहे.*
*दुसरा प्रयोग रविवार दिनांक* *११ फेब्रुवारी २०२४* *रोजी दुपारी बारा ते* *चार यावेळेत कोथरूड* *पुणे येथील यशवंतराव* *चव्हाण नाटयगृहात होणार* *आहे* या महानाट्यात सुमारे तीनशे अंध, दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रम मोफत असून पुणेकरांनी याला प्रतिसाद देऊन मुलांचा उत्साह वाढवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ही माहिती लोकविश्वास प्रतिष्ठानच्या सचिव सविता देसाई आणि प्रिन्सिपल अरविंद मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सन २०२० मध्ये बाबूजी व गदिमांची जन्मशताब्दी होती त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लोकविश्वास प्रतिष्ठानच्या मुलांनी गीत रामायणाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली होती. सन २०२० सालचा प्रयोग पुणेकरांनी बघितला होता आणि पुणेकरांच्या आग्रह खातर या महानाट्याचा प्रयोग पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. असेही सविता देसाई यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क
सविता देसाई मोबाईल नंबर
9403270518