Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorized62 वा राष्ट्रीय सागरी दिन (नॅशनल मरिटाईम डे) साजरा

62 वा राष्ट्रीय सागरी दिन (नॅशनल मरिटाईम डे) साजरा

पुणे,7 एप्रिल 2025 : पुणे स्थित सागरी क्षेत्रातील संघटना असलेल्या कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स (सीएमएमआय), इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया (आयएमईआय),इंडियन मरिटाईम फाऊंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र मास्टर्स मरिनर्स असोसिएशन यांच्या तर्फे नुकतेच पीवायसी पुणे येथे 62 व्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त (नॅशनल मरिटाईम डे) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम नौदलाचे माजी प्रमुख वाईस ॲडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा उपस्थित होते.याबरोबरच मरिटाईम फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित,इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया,पुणेचे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंते संजीव ओगले, कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स (सीएमएमआय) चे अध्यक्ष कॅप्टन मिलिंद फडणीस,सीएमएमआयचे सचिव कॅप्टन किरण जोशी आणि सीएमएमआयचे संस्थापक सदस्य व इंडियन कोस्टल कॉन्फरन्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सुधीर सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी कॅप्टन आर.हजरनवीस, कॅप्टन उन्मेष अभ्यंकर,कॅप्टन विजय बर्वे,प्रमुख अभियंता आर.डी.भावे या सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या वरिष्ठ व्यावसायिकांचा त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पश्चिम नौदलाचे माजी प्रमुख वाईस ॲडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments