Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedएक्सॉनमोबिलने मोबिल डेल्व्हॅक लुब्रिकंट्सचा १००वा वर्धापन दिन साजरा केला

एक्सॉनमोबिलने मोबिल डेल्व्हॅक लुब्रिकंट्सचा १००वा वर्धापन दिन साजरा केला

भारत, ७ एप्रिल, २०२५: मोबिल डेल्व्हॅक ब्रँड या वर्षी आपला १००वा वर्धापन दिन साजरा करत आहे, जो डिझेल इंजिन ल्‍युब्रिकेशनमधील इनोव्‍हेशनच्‍या शतकाला साजरे करत आहे. मोबिल डेल्‍व्‍हॅक ब्रँड इंजिन कार्यक्षमता आणि दीर्घकालीन कामगिरीसाठी जगभरात ओळखला जातो.

 

शतकभराच्‍या सर्वोत्तमतेप्रती समर्पित

 

या ऐतिहासिक प्रसंगी, कंपनी उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित करणाऱ्या ग्राहकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पिढ्यांचा सन्मान करत आहे. मोबिल डेल्‍व्‍हॅक टीम वर्षभर ब्रँडच्‍या इतिहासामधील सर्वात महत्त्वपूर्ण गाथांना दाखवतील. ही सिरीज मोबिल डेल्‍व्‍हॅक शक्‍यतांना नव्‍या उंचीवर नेलेल्‍या ग्राहकांना, जगाशी कनेक्‍ट झालेल्‍या फ्लीट्सना, उल्‍लेखनीय सूत्रीकरण विकसित केलेल्‍या इंजीनिअर्स आणि अशा विविध गोष्‍टींना दाखवेल.

 

”मोबिल डेल्‍व्‍हॅक उत्‍पादने विश्‍वासार्हता आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली जातात, अगदी ग्राहकांप्रमाणेच जे दररोज त्यांच्यावर अवलंबून असतात,” असे एक्‍सॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रायव्‍हेट लिमिटेडच्‍या ल्‍युब्रिकण्‍ट्स (साऊथ एशिया पॅसिफिक)चे विपणन संचालक चार्लीन परेरा म्‍हणाले.

 

”१०० वर्षांच्‍या वारसासह मोबिल डेल्‍व्‍हॅक™ ने उद्योगात आपली नेतृत्व भूमिका स्थापित केली आहे. ही कामगिरी आम्‍हाला मर्यादांना दूर करण्‍यास आणि सुधारणांना चालना देत राहण्‍यास प्रेरित करते, ज्‍यामुळे उद्योग वर्षानुवर्षे कार्यक्षमपणे प्रगती करत राहण्‍याची खात्री मिळते.”

 

इनोव्‍हेशनचा वारसा

 

वर्धापन दिन साजरीकरणासोबत मोबिल डेल्‍व्‍हॅक ब्रँडच्‍या संपन्‍न वारसाला सन्‍मानित करण्‍यात येईल. १९२५ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेले डेल्‍व्‍हॅक नावाचा अर्थ आहे ‘डिझेल इंजिन ल्‍युब्रिकण्‍ट बाय व्‍हॅक्‍यूम ऑइल’. सुरुवातीला उदयोन्‍मुख डिझेल उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी लाँच करण्‍यात आलेला हा ब्रँड काळाच्या कसोटीवर यशस्‍वी ठरला आहे आणि आज अनेक उद्योगांसाठी सुवर्ण मानक बनला आहे.

 

गेल्या शतकात, मोबिल डेल्व्हॅक टीम्सनी डिझेल तंत्रज्ञान अधिक विश्‍वासार्ह बनवले आहे. त्‍यांनी कार्यक्षम मटेरिअल फ्लो, आव्‍हानात्‍मक हवामान स्थितींमध्‍ये सुधारित मशिन स्थिरतेसाठी कार्गो ट्रक विश्‍वसनीयता वाढवली आणि सर्वोत्तम कार्यचालन नियोजनासाठी ल्‍युब्रिकण्‍ट अॅनालिसिस प्रोग्राम्‍स विकसित केले.

 

उज्‍ज्‍वल भविष्याच्‍या दिशेने वाटचाल

 

जग सतत बदलत आहे आणि मोबिल डेल्‍व्‍हॅक इनोव्‍हेशन व सर्वोत्तमतेच्‍या अग्रस्‍थानी आहे. जागतिक महामार्ग यंत्रणांचे विस्‍तारीकरण आणि वाढत्‍या ग्राहक मागण्‍यांमधून डिझेल इंजिन क्षमता व सर्व हवामान स्थितींमधील कार्यक्षमता दिसून आली आहे. उत्‍सर्जन नियमनांमुळे एक्‍झॉस्‍ट गॅस रिसर्क्‍युलेशन (ईजीआर) तंत्रज्ञानाच्‍या विकासाला गती मिळाली, यामुळे नवीन ल्‍युब्रिकण्‍ट्सची निर्मिती वाढली आणि इंटर्नल कम्‍बशन इंजिन्‍सची कार्यक्षमता सुधारली.

 

”शतकापासून आम्‍ही उद्योग इनोव्‍हेशनचे नेतृत्‍व केले आहे, पुढे जात राहण्‍यासाठी कार्यक्षमता आणि संरक्षण देत आहोत,” असे एक्‍सॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रायव्‍हेट लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अंकुश खन्‍ना म्‍हणाले. ”मोबिल डेल्‍व्‍हॅक उत्तमरित्‍या डिझाइन केलेल्‍या ऑइल्‍ससह हा वारसा पुढे घेऊन जात आहे, जे उद्योगाच्‍या गरजा व ओईएम वैशिष्‍ट्यांची पूर्तता करतात किंवा त्‍यापुढे जातात, ज्‍यामुळे इंजिन्‍स आणि हेवी-ड्युटी उपकरणांचे संरक्षण होण्‍यास मदत होत आहे. आम्‍ही सानुकूल सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे भारतातील विकसित होत असलेल्‍या कमर्शियल वेईकल लँडस्‍केपमध्‍ये कार्यक्षमता व टिकाऊपणाच्‍या मर्यादांना दूर करतात.”

 

मोबिल डेल्‍व्‍हॅक™ टीमच्‍या वर्धापन दिन साजरीकरणामध्‍ये या सुधारणांना व इतर बाबींना दाखवले जाईल. यामुळे दिसून येईल की, हा ब्रँड नेहमी चांगले काम करण्याचा प्रयत्‍न करतो.

 

मोबिल डेल्‍व्‍हॅक ब्रँड बाबत

 

शतकानुशतके कौशल्य आणि नावीन्यपूर्णतेसह मोबिल डेल्‍व्‍हॅक प्रगत हेवी-ड्युटी ल्‍युब्रिकण्‍ट्समधील मान्‍यताकृत व आघाडीचा ब्रँड आहे. इनोव्‍हेटर्स व व्‍यवसायांचा विश्‍वास असलेली मोबिल डेल्‍व्‍हॅक उत्‍पादने उपकरणांना सर्वोच्‍च स्थितीमध्‍ये कार्यरत ठेवतात, ऑइल ड्रेन इंटरव्‍हल्‍स वाढवतात आणि कमी ल्‍युब्रिकण्‍ट वापर व लेबर खर्च कमी करत ऑपरेटिंग खर्च देखील कमी करतात.

 

 

 

 

वापरलेल्या उपकरणांचा प्रकार, त्याची देखभाल, ऑपरेटिंग परिस्थिती आणि वातावरण तसेच पूर्वी वापरलेल्या कोणत्याही ल्‍युब्रिकण्‍ट्सवर अवलंबू

न प्रत्यक्ष परिणाम बदलू शकतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments