Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedडिजिटल माध्यम व तंत्रज्ञानाचे नीतीनियम सर्वांनीच आवर्जून समजावून घ्यावेत बीएनसीएत विद्यार्थिनींना...

डिजिटल माध्यम व तंत्रज्ञानाचे नीतीनियम सर्वांनीच आवर्जून समजावून घ्यावेत बीएनसीएत विद्यार्थिनींना सायबर तज्ज्ञ हर्षद देशपांडे आणि दीप्ती लेलेंचे मार्गदर्शन

पुणे, दि. ९ एप्रिल २०२५ : इन्स्टाग्राम तसेच व्हॉटस्‌‍ॲप व अन्य डिजिटल माध्यमांचा वापर तरुण पिढीबरोबरच सर्व वयातील स्त्री-पुरुषांनी सामाजिक व आर्थिक कामांसाठीही करावा लागतो आहे. यासाठी डिजिटल माध्यम व तंत्रज्ञानाचे असणारे नीतीनियम सर्वांनीच आवर्जुन समजावून स्वत:ला अद्ययावत केले पाहिजे, असे मार्गदर्शन प्रसिद्ध सायबर सुरक्षा तज्ज्ञ हर्षद देशपांडे आणि डॉ.दीप्ती लेले यांनी विद्यार्थिनींना केले.

 

महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) विद्यार्थिनींसाठी ‌‘तिच्या‌’साठी सायबर सुरक्षा आणि गुन्हेगारीबाबतची जागृती‌’ यावर व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्यामध्ये देशपांडे आणि डॉ.लेले बोलत होते. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना डॉ.वसुधा गोखले आणि डॉ. मीरा शिरोळकर यांची असून त्याचे आयोजन प्रा. गीता नगरकर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे तसेच डॉ.चेतन सहस्रबुद्धे उपस्थित होते.

 

देशपांडे यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व विषद करताना विविध प्रकारच्या सायबर भ्रष्टाचाराची माहिती सांगितली. त्याचा फटका आता सर्वांनाच बसू लागला आहे. यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मायाजालांची (वेबसाईट) माहिती देताना हे गुन्हे कुठे व कसे नोंदवायचे याचेही त्यांनी विस्ताराने मार्गदर्शन केले.

 

डॉ. लेले यांनी सायबर गुन्ह्यांची अनेक उदाहरणे सांगताना या प्रकारच्या गुन्हेगारीचे स्वरूप व त्याचे परिणाम याबाबत माहिती सांगितली.

 

डॉ. कश्यप म्हणाले की, सायबर गुन्हेगारीचा विळखा हा सर्व क्षेत्रात पडू लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच सावध राहायला हवे. ते म्हणाले की, या विषयाचे महत्त्व हे संस्थात्मक पातळीवर व शैक्षणिक क्षेत्रापर्यंत जास्तीत जास्त पोचायला

हवे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments