Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहेश लंच होम तर्फे सीफूड फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन

महेश लंच होम तर्फे सीफूड फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन

पुणे, 3 फेब्रुवारी २०२४ : उत्कृष्ट सीफूड खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या महेश लंच होम तर्फे वर्षातील बहुप्रतिक्षित अशा द सीफूड फेस्टिव्हल 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी स्वादिष्ट सीफूड पदार्थांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहेत.

रसाळ जर्क प्रॉन्सपासून ते बटरी तंदूरी बुकनी मसाला लॉबस्टरपर्यंत, प्रत्येक खाद्य पदार्थ हा उत्कृष्ट नमुना असणार आहे,जो अप्रतिम जेवणाचा आनंदादायी अनुभव प्रदान करेल. याबरोबरच प्रॉन बिस्क सूप, तंदूरी नागा चिली क्रॅब, करावली स्क्विड रवा फ्राय,आंध्र गोंगुरा मसाला लॉबस्टर, हरनाई बॉम्बिल, पोमफ्रेट चापला वेपुडू, मंगलापुरम तूप रोस्ट प्रॉन्स, आंबोट टिक, क्रॅब वरुथा स्टाईल, किझि बिर्याणीज हे आवर्जून अनुभवण्याजोगे पदार्थ आहेत. तसेच नारळाच्या करवंटीवर सादर केला जाणारा सेमिया पायसम हा गोड खाद्यपदार्थ भोजनाचा अनुभव मधुर करणारा असेल.

याप्रसंगी बोलताना शिवसागर फूड्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नारायण पुजारी म्हणाले की, महेश लंच होम सीफूड फेस्टिव्हल हा भारताच्या भव्य किनार पट्टीच्या भागांमधील खाद्यपदार्थांचा आनंद देणारा आमचा वार्षिक खाद्य महोत्सव असून यामध्ये खवय्यांना रमणीय वातावरणात स्वादिष्ट, उत्कृष्ट व रुचकर सीफूड खाद्यपदार्थांचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. या फेस्टिवलमध्ये सुगंधी पेयांसह ताज्या आणि स्थानिक सीफूडचा आनंद घेता येणार आहे.

पारंपारिक दक्षिण भारतीय वेशभूषा परिधान केलेले आमचे कर्मचारी फेस्टिव्हलला भेट देणाऱ्यांचे स्वागत करून संस्कृती आणि वारशाचा अनोखा अनुभव प्रदान करतील.याबरोबरच स्वादिष्ट भोजनासह उत्साहपूर्ण असे कोस्टल म्युझिक उत्तम जेवणाचा अनुभव संस्मरणीय करेल. समुद्राखालील जग दर्शविणारी अशी रेस्टॉरंटची सजावट ही एकदंर खाद्याअनुभवात आणखी भर टाकेल. यामध्ये प्रत्येक कोपरा हा सीफूड-प्रेरित सजावटीने सुशोभित केला आहे. खवय्यांना सागरी वातावरण अनुभवता यावे म्हणून प्रवेशद्वारावरील खेकड्याचे शिल्प, छत आणि भिंतींवरील आकर्षक माशांची जाळी, जहाजाची चाके आणि अँकर अशा समुद्राच्या प्रेरणेतून कलाकृतीपर्यंत, प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेला आहे.

हा सीफूड फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून कॅम्प येथील आउटलेटमध्ये सुरू झाला असून महिनाभर चालणारा पाककलेचा उत्सव खवय्यांना आनंदी अनुभव प्रदान करेल हे नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments