पुणे,14 एप्रिल 2025 : एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,कोथरूड येथे पालवीया फाऊंडेशन यांच्या तर्फे आणि नुक्कड कॅफे,एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटीडब्ल्यूपीयू),नॅशनल एचआरडी नेटवर्क-पुणे चॅप्टर,विलू पुनावाला फाऊंडेशन,समिक्षा सोशल इनिशिएटिव्ह आणि रायटर्स वेब यांच्या सहकार्याने आयोजित पुस्तक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रख्यात भारतीय टेलिव्हिजन निर्माते आणि सादरकर्ते सिध्दार्थ काक, सकाळ माध्यम समुहाचे प्रकाशन व्यवसाय प्रमुख आशुतोष रामगीर, लेखक व दिग्दर्शक किरण यज्ञोपवित एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटीडब्ल्यूपीयू)चे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, चीफ ॲकेडेमिक ऑफिसर डॉ.संजय कामटेकर, एमआयटीडब्ल्यूपीयूच्या स्कुल ऑफ लिबरल आर्टस्चे अधिष्ठाता डॉ.विशाल घुले, अनुवादक व भाषा प्रशिक्षक ललिता मराठे, पालवीया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफेचे संस्थापक वैभव पालीवाल आणि एनएचआरडी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष अमन राजाबली आदी मान्यवर उपस्थित होते.
एमआयटीडब्ल्यूपीयूच्या स्कुल ऑफ लिबरल आर्टस्च्या सहाय्यक प्राध्यापिका श्रेया बेरा यांनी फ्रॉम लेटर्स ॲन्ड डायरीज् या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रख्यात भारतीय टेलिव्हिजन निर्माते आणि सादरकर्ते सिध्दार्थ काक यांच्याशी लव्ह,एक्झाईल,रेडेमप्शन या नव्या पुस्तकाबाबत संवाद साधला.आजच्या जगात युवकांनी काय क्षणभंगुर आहे आणि काय कायमचे आहे हा विचार केला पाहिजे.त्यासाठी तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याचा सल्ला त्यांनी तरूणांना दिला. डिजिटल युगात विविध माध्यमांद्वारे सादर केल्या जाणारा आशय हा ठाराविक काळापुरता आकर्षक वाटू शकतो,मात्र शब्दांमध्ये दृश्यनिर्मिती करण्याची ताकद असते.
एमआयटीडब्ल्यूपीयूच्या स्कुल ऑफ लिबरल आर्टस्चे सहाय्यक प्राध्यापक संदीप पगार यांनी शेपिंग स्टोरीज,पब्लिशिंग ड्रीम्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळ माध्यम समुहाचे प्रकाशन व्यवसाय प्रमुख आशुतोष रामगीर यांच्याशी संवाद साधला.यावेळी बोलताना आशुतोष रामगीर म्हणाले की,पुस्तके ही चांगले सोबती असतात.डिजिटल तंत्रज्ञानामुळे भारतात प्रकाशन उद्योगाच्या भविष्याला चालना मिळत आहे. यामुळे प्रकाशकांना उद्योगाला संरचनात्मकदृष्ट्या सुधारण्यासाठी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या नव्या पिढीसाठी पुस्तकांच्या निर्मिती करणे हे एक आव्हानात्मक बाब आहे. त्यासाठी वाचक, लेखक, प्रकाशक आणि आणि प्रकाशन क्षेत्राचा व्यापक अभ्यास करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटीडब्ल्यूपीयू) चे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले की, यंदाच्या पुस्तक महोत्सवाची संकल्पना एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरीज (असाधारण कथा) ही असून ज्या व्यक्तींनी विविध आव्हानांवर मात केली आहे,अशांची परिवर्तशील शक्ती कथाकथनेद्वारे सादर केली जाणार आहे.
या महोत्सवामध्ये दृष्टीहीन कवी,दिव्यांग लेखक,तिहार तुरुंगातील कैद्यांच्या कविता सादर करण्यात आल्या.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हेतूपूर्ण लेखन,साहित्याचे महत्त्व आणि कृतीला प्रेरणा देण्यासाठी आकर्षक कथन करण्याची क्षमता याविषयी देखील सखोल मार्गदर्शन करण्यात आ
ले.


