सीझन 1 मध्ये 9 देशांमधून एकूण 104 ॲथलिट्सनी नोंदणी केली होती.
भारतातील आघाडीच्या मोटरस्पोर्ट्स प्लॅटफॉर्मसाठी रायडर नोंदणीसाठी जगभरातून विचारणा होत आहे.
पुणे, 15 एप्रिल, 2025 : जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीग – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) – पुन्हा एकदा उत्साहात परतली आहे! प्रेक्षकांच्या मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षेत असलेला सीझन 2 रायडर नोंदणीच्या उद्घाटनासह सुरू होत आहे – 24th एप्रिल, 2025. यामध्ये अधिक थरारक ॲक्शन, आंतरराष्ट्रीय नवोदित चेहरे आणि जगभरातील प्रसिद्ध रायडर्सचा पुनरागमन यांचा समावेश असेल.
पहिल्या पर्वातच मोठ्या यशाची नोंद करत, ISRL ने 9 देशांतील 100 हून अधिक अव्वल रायडर्सना एकत्र आणलं आणि भारतभरातील शहरांमधील चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. हे यश पाहता, ISRL आता जागतिक मोटरस्पोर्ट्स टॅलेंट आणि गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक व्यासपीठ म्हणून झपाट्याने उदयास येत आहे. सीझन 2 आता आणखी मोठ्या आकांक्षा, विस्तारित स्वरूप आणि स्टार पॉवरसह अधिक उंची गाठण्याच्या तयारीत आहे आणि यामध्ये सर्वात मोठी भर पडली आहे सुपरस्टार सलमान खान यांच्या रूपाने, जे आता लीगचे अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे लीगला व्यापक पोहोच आणि प्रसिद्धी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय ॲथलिट्सकडून नोंदणीसाठी विचारणा सुरू झाली आहे आणि देशांतर्गत तगडी खेळाडू मंडळी सज्ज आहेत, यामुळे ISRL च्या या नव्या पर्वाची सुरुवात अत्यंत थरारक होणार यात शंका नाही.
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह-संस्थापक, ईशान लोखंडे म्हणाले, “ISRL चा पहिला सीझन हा एक प्रारंभ होता. जागतिक स्तरावर मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि देशांतर्गत रायडर्समधील उत्कटता पाहता, सीझन 2 मध्ये आम्ही नव्या उत्साहाने, नव्या आत्मविश्वासाने आणि मोठ्या दृष्टिकोनासह सहभागी होत आहोत. सलमान खान यांचं ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लीगसोबत जोडणं ही केवळ प्रसिद्धीची गोष्ट नाही. त्यांच्या असामान्य आकर्षणामुळे सुपरक्रॉसला भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक नवा आयाम मिळेल. भारतीय मोटरस्पोर्टला जागतिक व्यासपीठावर त्याचं योग्य स्थान मिळवून देणं, हे आमचं उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही भव्य, जागतिक दर्जाचं व्यासपीठ निर्माण करण्याचा मानस ठेवतो. या वर्षी अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय रायडर्स परत येत आहेत आणि त्याचबरोबर नवीन, जोशात असलेल्या रायडर्सची फौज तयार आहे. हा सीझन निश्चितच एक थरार, वेग आणि साहसाने भरलेला प्रवास ठरणार आहे. एक असा अनुभव, जो प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला जाईल.”
तीन वेळा भारतीय राष्ट्रीय सुपरक्रॉस चॅम्पियन असलेले रुग्वेद बार्गुजे 3 म्हणाले, “ISRL च्या सीझन 1 मध्ये रेसिंग करणे एक अविस्मरणीय अनुभव होता. प्रेक्षकांचे समर्थन, स्पर्धेची तीव्रता आणि भारतातील वास्तविक सुपरक्रॉस ट्रॅकवर रेसिंग करण्याची मिळालेला संधी हे सर्व एका स्वप्नाप्रमाणे होते. या लीगने भारतीय मोटरस्पोर्टच्या खेळाला एक नवा आयाम दिला आहे. त्याला अधिक सुव्यवस्थित आणि संरचित बनविले आहे, ज्यामुळे मोटरस्पोर्ट ॲथलीट्ससाठी एक व्यावसायिक व्यासपीठ तयार झाले आहे. सीझन 2 आणखी अधिक रोमांचक आणि थरारक होणार आहे आणि त्याचा भाग होण्यासाठी मला प्रतीक्षा करावी लागली आहे.”
MX2 वर्ल्ड चॅम्पियन (2014) जॉरडी टिक्सियर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ISRL चा पहिला सीझन माझ्या सर्व अपेक्षांपेक्षा खूपच भव्य ठरला. ट्रॅकची गुणवत्ता, प्रेक्षकांचा उत्साह आणि आयोजकांकडून सातत्याने केली जाणारी सुधारणा, यामुळे हा अनुभव अत्यंत खास झाला. भारतात सुपरक्रॉससाठी असलेली खरी आवड आणि जोश अनुभवायला मिळाला व त्यामुळेच पुन्हा भारतात येण्याची मला प्रचंड उत्सुकता आहे. सीझन 2 मध्ये आणखी सुंदर आठवणी तयार करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे!”
Reise Motosports चे आंतरराष्ट्रीय रायडर ब्रेंडन सिप्पल यांनी आपला उत्साह व्यक्त करत सांगितले की, “प्रेक्षकांपासून ते ट्रॅक्सपर्यंत सीझन 1 मधील प्रत्येक गोष्ट जागतिक दर्जाची होती. ती ऊर्जा, संघांची तयारी आणि संपूर्ण वातावरणच जबरदस्त होतं. भारतात रेसिंग करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्य होतं. आता सीझन 2 मध्ये काय धमाका होणार, याची मला खरंच उत्सुकता आहे. ISRL इथे खरंच काहीतरी अद्वितीय आणि प्रेरणादायक निर्माण करत आहे.”
सीझन 1 मध्ये जागतिक मोटोकॉक्रॉसमधील काही मोठ्या नावांचा समावेश होता, ज्यामध्ये जॉरडी टिक्सियर (MX2 वर्ल्ड चॅम्पियन, 2014), मॅट मॉस (9 वेळा ऑस्ट्रेलियन MX आणि SX चॅम्पियन), थॉमस रामेट, ह्यूगो मॅन्झॅटो आणि इतर अनेक आघाडीचे रायडर्स सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलिया ते फ्रान्स आणि थायलंडपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावान रायडर्सनी सहभाग घेतला होता. भारतीय चॅम्पियन्स जसे की, रुग्वेद बार्गुजे, ईक्षण शानभाग, प्रज्वल विश्वनाथ, सार्थक चव्हाण आणि श्लोक घोरपडे यांनी जागतिक स्तरावरील प्रो रायडर्ससोबत खांद्याला खांदा लावत रेस केली आणि जागतिक दर्जाच्या ट्रॅक्सवर इतिहास घडविला.
रायडर नोंदणी प्रक्रिया चार प्रमुख स्पर्धात्मक श्रेणींमध्ये केली जाते:
450cc आंतरराष्ट्रीय रायडर्स
250cc आंतरराष्ट्रीय रायडर्स
250cc इंडिया-एशिया मिक्स
85cc ज्युनिअर क्लास
इंटरेस्टेड रायडर्स आता नोंदणी करू शकतात आणि 2025 सीझनसाठी संघ त्यांच्या स्वप्नातील टीम तयार करणार असलेल्या मेगा लिलावाचा भाग बनू शकतात. कृपया लक्षात घ्या, नोंदणी ही सहभागाची हमी नाही, ती केवळ अधिकृत रायडर पूलमध्ये सामील होण्यासाठीचा पहिला टप्पा आहे, ज्यावरून लिलाव प्रक्रियेदरम्यान संघ निवड करतील.
ISRL चा पहिला सीझन भारतीय मोटरस्पोर्टसाठी एक नवा मैलाचा दगड ठरला, ज्यामध्ये तीन दिवसांच्या ब्रॉडकास्टमध्येच 11.5 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिलं आणि 30,000 हून अधिक प्रेक्षकांनी थेट उपस्थिती लावली. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सुपरक्रॉस इव्हेंटसाठी जागतिक स्तरावर नव्या विक्रमाची नोंद झाली आणि भारतात मोटरस्पोर्टच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया रचला.
भारताचे डकार रॅलीतील पहिले अग्रदूत सीएस संतोष यांच्या नेतृत्वाखालील टीम बिगरॉक मोटरस्पोर्ट्सने पहिल्या सीझनमध्ये विजेतेपद पटकावले आणि स्पर्धेच्या दर्जासाठी एक उच्च निकष प्रस्थापित केला. या पहिल्या सीझनने भारतात जागतिक दर्जाच्या सुपरक्रॉस ॲक्शनसाठी असलेली मोठी उत्सुकता आणि मागणी अधोरेखित केली व या खेळाच्या भविष्यातील विकासासाठी
एक मजबूत पाया घातला.


