नागपूर दि. 03 फेब्रु. (क्री. प्र.) विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर येथे आयोजिलेल्या सुवर्ण महोत्सवी खुल्या राज्य ज्यूदो स्पर्धेच्या आजच्या दुसर्या दिवशी सिनियर्स मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधिनीच्या संघाने सात वजन गटांमधील खेळाडूंनी निर्विवाद खेळी करत चार सुवर्ण पदके पटकावली तर मुलांमध्ये पुणे डिस्ट्रिक्ट संघटनेने सर्वाधिक तिन सुवर्ण पदके पटकावली. मुलींमधील क्रीडा प्रबोधिनीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू समीक्षा आणि स्नेहल यांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करून आपले वर्चस्व अबाधित राखले. तर पुणे डिस्ट्रिक्टच्या संघातील हर्षल थिटे, अंकित सोनवणे आणि आदित्य परब यांनी राज्यातील क्रमांक एकाचे स्थान राखले. मुंबईचा आंतरराष्ट्रीय खेळाडू ईशान कनोजिया याची अजिंक्य मते या पुणे डिस्ट्रिक्टच्या खेळाडूसह अटीतटीची लढत अपेक्षित होती पण ईशानने आपल्या अनुभवाच्या जोरावर अजिंक्य मतेवर सर्वाधिक कमी वेळाची नोंद करत केवळ 17 सेकंदात को-ऊची-माकेकोमी डावाने ईप्पोन मिळवत मात केली. सुवर्ण पदक पटवलेल्या खेळाडुंमध्ये पूर्ण गुणाने विजय मिळवलेल्या 66 किलोखालील गटाच्या धनंजय खैरनारने मुंबईच्या विहान कोटीयान याला सोदेत्सुरी-कोमी-गोशी डावावर फक्त 29 सेकंदात आस्मान दाखवून इप्पोन हा पूर्ण गुण घेतला. तर पिडीजेएच्या आदित्य परबने अहमदनगरच्या शुभम दातरंगेवर तानीओ तोशी डावाने पूर्ण गुण मिळवला. या स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बँक, लोकमान्य क्रेडिट सोसायटी आणि अॅमनोरा यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे;
सिनियर्स गट- मुली
48 किलोखालील
सुवर्ण-आकांक्षा शिंदे, नाशिक
रौप्य-रोहिणी मोहिते, सातारा
कांस्य-भक्ति भोसले, ठाणे
कांस्य-साक्षी कांबळे, क्रीडा प्रबोधिनी
52 किलोखालील
सुवर्ण-वैष्णवी पाटील, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-दिशा खरे, गोंदिया
कांस्य-संजना शिंदे, धुळे
कांस्य-शर्वरी गोडसे, मुंबई
57 किलोखालील
सुवर्ण-वैष्णवी खलाणे, नाशिक
रौप्य-आलिया अंसारी, मुंबई
कांस्य-अश्विनी सोलङ्के, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य-निधी पेडणेकर, ठाणे
63 किलोखालील
सुवर्ण-स्नेहल खावरे, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-गायत्री निकम, सांगली
कांस्य-अनिता अघारकर, ठाणे
कांस्य-जॅस्मिन अंसारी, मुंबई
70 किलोखालील
सुवर्ण-समीक्षा शेलार, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-आफिफा सईद, पिजेए
कांस्य-प्रियंका सणस, मुंबई
कांस्य-उन्नती जांभूळकर, पिडीजेए
78 किलोखालील
सुवर्ण-संस्कृती पाटील, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-संपदा फाळके, मुंबई
कांस्य-सायली, ठाणे
कांस्य-तनुजा वाघ, नाशिक
78 किलोवरील
सुवर्ण-अपूर्वा पाटील, ठाणे
रौप्य-शांभवी कदम, मुंबई सिनियर्स गट- मुले
60 किलोखालील
सुवर्ण-अवधूत पाटील, कोल्हापूर
रौप्य-ओम हिंगमिरे, परभणी
कांस्य-सारंग शहाणे, अमरावती
कांस्य-वैभव भानखेडे, वर्धा
66 किलोखालील
सुवर्ण-इशान कनोजिया, मुंबई
रौप्य-अजिंक्य मते, पीडिजेए
कांस्य-धनंजय खैरनार, धुळे
कांस्य-निनाद अरसूड, यवतमाळ
73 किलोखालील
सुवर्ण-अंकित सोनवणे, पीडिजेए
रौप्य-अभिजीत इजनकर, नागपूर
कांस्य-अंशराज जयस्वाल, सोलापूर
कांस्य-आयुष फाळके, मुंबई
81 किलोखालील
सुवर्ण-हर्षल थिटे, पीडिजेए
रौप्य-प्रदीप गायकावाड, सोलापूर
कांस्य-भूषण घटत्विसावे, अहमदनगर
कांस्य-प्रवेन्द्र सिंग, ठाणे
90 किलोखालील
सुवर्ण-रोहित कोळी, पिजेए
रौप्य-शेख मो.फरजाद, छत्रपती संभाजीनगर
कांस्य-एस. बालाजी, पीडिजेए
कांस्य-हर्षवर्धन पाटील, कोल्हापूर
100 किलोखालील
सुवर्ण-पृथ्वीराज जाधव, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-ऋतिक बोंडवे, पीडिजेए
कांस्य-फिरोज सय्यद, अहमदनगर
कांस्य-विकास देसाई, छत्रपती संभाजीनगर
100 किलोवरील
सुवर्ण-आदित्य परब, पीडिजेए
रौप्य-शुभम दातरंगे, अहमदनगर
कांस्य-ओंकार चौरे, धाराशिव
कांस्य-यश पिढेकर, अमरावती
कॅडेट गट- मुले
55 किलोखालील
सुवर्ण-पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूर
रौप्य-रविराज अंभुले, सोलापूर
कांस्य-दर्शन गवळे, क्रीडा प्रबोधिनी
कांस्य-रोहित तांबारे, छत्रपती संभाजीनगर
60 किलोखालील
सुवर्ण-पृथ्वीराज शेलार, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-पंकज मुळजे, धाराशिव
कांस्य-जयवर्धन कल्याणकर, कोल्हापूर
कांस्य-तेजस चव्हाण, ठाणे
66 किलोखालील
सुवर्ण-धनंजय खैरनार, धुळे
रौप्य-विहाण कोटीयान, मुंबई
कांस्य-निनाद अरसुड, यवतमाळ
कांस्य-ऋषिकेश पुंड, छत्रपती संभाजीनगर
73 किलोखालील
सुवर्ण-अंशराज जयस्वाल, सोलापूर
रौप्य-रोहित चव्हाण, नाशिक
कांस्य-राज नंदनवंशी, अमरावती
कांस्य-सुशील ढोली, मुंबई कॅडेट गट- मुले
81 किलोखालील
सुवर्ण-यश कांबळे, पीडिजेए
रौप्य-जय थापा, ठाणे
कांस्य-धर्मराज गोडगे, सोलापूर
कांस्य-स्वराज लाड, क्रीडा प्रबोधिनी
90 किलोखालील
सुवर्ण-गणेश मासळकर, बीड
रौप्य-आर्यन मल्होत्रा, मुंबई
कांस्य-अथर्व खंडागळे, धारशिव
कांस्य-चैतन्य कवडे, सोलापूर
90 किलोवरील
सुवर्ण-मंनवर्धन पाटील, ठाणे
रौप्य-ओंप्रसाद निंबाळकर, धाराशिव
कांस्य-अक्षज पिल्लई, मुंबई
कांस्य-प्रतीक पवार, पिजेए


