Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्राह्म संगीतातून पुणेकरांनी अनुभवल्या भक्तीच्या अनंत आनंदधारा पुणे प्रार्थना समाजाच्यावतीने चैत्रोत्सव २०२५...

ब्राह्म संगीतातून पुणेकरांनी अनुभवल्या भक्तीच्या अनंत आनंदधारा पुणे प्रार्थना समाजाच्यावतीने चैत्रोत्सव २०२५ चे आयोजन – उपासना ग्लोबल फोरमच्या वतीने ब्राह्म संगीताचे सादरीकरण

पुणे : भक्ती, सौंदर्य आणि सत्याच्या आराधनेचे प्रतीक असलेले ‘आनंद लोके, मंगला लोके, बिराजो सत्य सुन्दर’ हे स्तुतीगीत, ‘हे सखा मम हृदये रहो संसारे सब काजे, ध्याने ज्ञाने हृदये’, या गीतांतून व्यक्त होणारा आत्मीय भक्तीभाव…तर ‘भय होते तब अभय माझे, नूतन जनम दाओ हे’, या गीतातून प्रकटलेली परमेश्वराची करुणामय आळवणी… रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या अशा विविध ब्राह्म गीतांतून पुणेकरांनी आध्यात्मिक आनंदधारेचा अनुभव घेतला.

 

पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने चैत्रोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले. यावेळी उपासना ग्लोबल फोरम, पुणे यांच्या वतीने ‘अनंत आनंदधारा’ या विशेष कार्यक्रमात ब्राह्म संगीताचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्षा डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग, तसेच उषाताई शर्मा, प्रशांत पाडवे, धनराज निंबाळकर, भास्कर मुजुमदार, डॉ.शिल्पा मुजुमदार हे सदस्य, तसेच डॉ. माधवी मित्रा, मुखोपाध्याय, अमित मझुमदार, सुरेखा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

श्रेया करमाकर, संदीप रॉय, प्रियांका भट्टाचार्य, मोमिता दास, सयारी दास, सौमिली दास, शॉम्पा रॉय, कुमकुम शहा, पांचाली गोस्वामी, मोमिता कुमार, मोमिता चॅटर्जी, रंजना शील, निलांजन भट्टाचार्य यांनी सादरीकरण केले. अक्षय शेळके (तबला), अंजली राव (व्हायोलिन), तमन रॉय यांनी साथसंगत केली. उपासना ग्लोबल फोरमच्या शर्मिला मझुमदार यांनी सूत्रसंचालन केले. त्याचवेळी अनुपम चक्रवर्ती, सोनिया शहा, मोमिता चक्रवर्ती या चित्रकारांनी हरिमंदिराचे चित्र रेखाटून रंगवले व पुणे प्रार्थना समाजाला भेट दिले.

 

कार्यक्रमाची सुरुवात ऋग्वेदातील ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम’ या मंत्राने झाली. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

‘ओई पोहाईलो तिमीरो राती…’, ‘प्रभु पूजीबो तोमोरे आजी…’ या गीतांच्या सादरीकरणातून परिसरात भक्तीचे वलय निर्माण झाले. डॉ. दिलीप जोग आणि डॉ. सुषमा जोग यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले ‘पादप्रांते राखो शेबोके’ ह्या गीताने कार्यक्रमाची सांगता के

ली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments