Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिक्की तर्फे डिकोडिंग युनियन बजेट २०२४-२५ कार्यक्रम संपन्न

फिक्की तर्फे डिकोडिंग युनियन बजेट २०२४-२५ कार्यक्रम संपन्न

पुणे,5 फेब्रुवारी 2024फिक्की महाराष्ट्र यांनी नॉलेज पार्टनर ग्रँट थॉर्नटन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच “डिकोडिंग युनियन बजेट २०२४-२५” या विषयावर अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक वेबिनार सत्राचे आयोजन केले होते. या वेबिनार मध्ये फिक्की महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्ष आणि कायनेटिक ग्रीन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी, हैद्राबाद येथील चार्टर्ड अकाउंटंट अमित कुमार, ग्रँट थॉर्नटन भारत चे इंडिरेक्ट टॅक्स पार्टनर करण कक्कर आणि फिक्की महाराष्ट्र राज्य परिषदेचे संचालक दीपक मुखी यांचे अर्थसंकल्पावरील सादरीकरणाचा समावेश होता.

वेबिनार मध्ये अर्थसंकल्पातील महत्वाच्या निर्णयांवर चर्चा करण्यात आली.उदघाटन सत्रानंतर पार पडलेल्या चर्चा सत्रात बिझनेस स्टँडर्ड चे कन्सल्टिंग एडिटर तमल बंडोपाध्याय यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. या चर्चासत्रामध्ये कार्यक्रमाच्या पॅनल सदस्यांमध्ये फिक्की कॅपिटल मार्केट कमिटी चे अध्यक्ष आणि नोवा वन कॅपिटल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील संघाई, फिक्की इकॉनॉमिस्ट फोरम चे सहअध्यक्ष आणि लार्सन अँड टुब्रो चे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. सच्चिदानंद शुक्ला, बँक ऑफ बडोदा चे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस, केअरएज ग्रुप च्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक च्या साऊथ एशिया इकॉनॉमिक रिसर्च चे प्रमुख अनुभूती सहाय यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments