राष्ट्रीय, २५ एप्रिल २०२५: किनले सोडा या कोका-कोलाच्या आघाडीच्या ब्रॅण्डने ₹१,५०० कोटी उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. सातत्य, दर्जा व ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर ब्रॅण्डने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. धरधरीत, मागणीवर आधारित पोर्टफोलिओवर उभ्या करण्यात आलेल्या ब्रॅण्डच्या या यशातून पेयांची विस्तृत श्रेणी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे धोरण अधोरेखित होते.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून किनले भारतासोबत वाढत आहे, दैनंदिन आयुष्यांचा आणि साजरीकरणाच्या क्षणांचा भाग होत आहे. रस्त्याच्या कडेला लावलेल्या ठेल्यांवरील लिंबू सोड्यापासून ते अव्वल दर्जाच्या हॉस्पिटॅलिटी मिक्सर्सपर्यंत ब्रॅण्डने विश्वासार्ह, उच्च दर्जाचा सोडा म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. त्याची चुरचुरीत चव आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्बनेशन यांमुळे तो प्रत्येक प्रसंगांसाठी, दुकानांमध्ये आणि पिढ्यांमध्ये पसंतीचा सोडा आहे.
सध्या २०० मिली ते २.२५ लीटर पेट अशा स्वरूपांत उपलब्ध असलेला किनले सोडा भारतातील १.४ दशलक्षांहून अधिक रिटेल दुकानांमधून खरेदी केला जाऊ शकतो. जवळच्या स्थानिक किराणा दुकानापासून ते स्विगी व झेप्टोसारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि आलिशान दुकानांपर्यंत सर्वत्र तो उपलब्ध आहे.
सोडा प्रवर्गात किनले सातत्याने आघाडीवर असल्यामुळे कोका-कोला इंडिया किनले स्ट्राँग सोडाला नवीन व टवटवीत ब्रॅण्ड ओळख देऊन त्याची उपलब्धता वाढवण्यावर काम करत आहे; दर्जा व ग्राहकांच्या विश्वास यांच्याप्रती असलेली बांधिलकी दृढ करत आहे.
कोका-कोला इंडिया आणि वायव्य आशियाच्या डेव्हलपिंग मार्केट्स, फ्रँचाइझ ऑपरेशन्स विभागांचे उपाध्यक्ष विनय नायर म्हणाले, “किनले सोडाच्या यशाचे मूळ विश्वास, सातत्य व दर्जा यांमध्ये आहे. आम्ही नेहमी अतिशयोक्तीवर नव्हे तर कार्यान्वयनावर लक्ष केंद्रित केले, आणि त्या शिस्तीमुळेच आमचा पोर्टफोलिओ वेगळा उठून दिसत राहिला. सखोल माहिती घेऊन आणि सहेतूक नवोन्मेष साध्य करून आम्ही प्रत्येक माध्यमामध्ये ब्रॅण्डचा विस्तार केला. दररोज किनलेची निवड करणाऱ्या लोकांचा गौरव या यशाद्वारे झाला आहे आणि निश्चित हेतूने, मागणीवर आधारित ब्रॅण्ड्स उभे करण्याचे आमचे धोरणही यातून दिसून येते. आम्ही याच ग्राहककेंद्री मानसिकतेसह वाढ साध्य करत राहू. कारण हेच धोरण खऱ्या अर्थाने व्यापकतेला चालना देते.”
डेटावर आधारित निर्णय, पुरवठा साखळीची ताकद आणि ग्राहकांना रिफ्रेशमेंटसाठी नेमके काय हवे आहे यावर एकाग्रतेने दिलेला भर यांच्या मदतीने सहेतूक नवोन्मेष साध्य करत बाजारपेठेत अग्रेसर राहण्याची कोका-कोला इंडियाची बांधिलकी किनले सोडाच्या यशोगाथेतून अधोरे
खित होते.


