Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडियाच्‍या 'ब्रँड आय१०'ने ३ दशलक्ष विक्रीचा टप्‍पा पार केला

ह्युंदाई मोटर इंडियाच्‍या ‘ब्रँड आय१०’ने ३ दशलक्ष विक्रीचा टप्‍पा पार केला

गुरूग्राम । एप्रिल २८, २०२५: ‘मेक इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्‍ड’ दृष्टिकोनाप्रती कटिबद्ध ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज घोषणा केली की, त्‍यांच्‍या ब्रॅंड आय१० ने भारतात व निर्यात बाजारपेठांमध्‍ये ३.३ दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. यापैकी एचएमआयएलने भारतात २ दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे आणि १४० हून अधिक देशांमध्‍ये १.३ दशलक्ष युनिट्स निर्यात केल्या आहेत. ब्रॅंड आय१० साठी दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, चिली व पेरू या अव्‍वल निर्यात बाजारपेठा आहेत. एचएमआयएल भारतातील पॅसेंजर वेईकल्‍सची सर्वात मोठी निर्यातदार आहे, जेथे जागतिक स्‍तरावर ह्युंदाई मोटर कंपनीसाठी निर्यात हब म्‍हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ करत आहे.

 

ह्युंदाई आय१० विक्रीबाबत मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. उन्‍सू किम म्‍हणाले, ”आम्‍हाला एचएमआयएलच्‍या ब्रँड आय१० च्‍या एकूण ३ दशलक्ष विक्रीचा टप्‍पा पार करण्‍याच्‍या उल्‍लेखनीय यशाचा अभिमान वाटतो. भारतात २ दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री आणि जागतिक बाजारपेठांमध्‍ये १.३ दशलक्षहून अधिक युनिट्सच्‍या निर्यातीसह आय१० मधून जागतिक दर्जाची उत्‍पादने वितरित करण्‍याप्रती एचएमआयएलची कटिबद्धता दिसून येते. या टप्‍प्‍याला अधिक विशेष बनवणारी बाब म्‍हणजे आय१० च्‍या विद्यमान निर्मितीने देशांतर्गत बाजारपेठेसाठी ९१.३ टक्‍के स्‍थानिकीकरण आणि निर्यात मॉडेल्‍ससाठी ९१.४ टक्‍के स्‍थानिकीकरण संपादित केले आहे. या यशामधून ग्राहकांचा आमच्‍यावरील विश्‍वास, भारतीय उत्‍पादनाची क्षमता आणि जगासाठी स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याप्रती एचएमआयएलची कटिबद्धता दिसून येते. महाराष्‍ट्रातील आमच्‍या आगामी प्‍लांटसह आमचा उदयोन्‍मुख व विकसित बाजारपेठांमध्‍ये निर्यात विस्‍तारित करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे एकूण विक्रीमध्‍ये निर्यातींचे योगदान वाढेल आणि मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्‍ड प्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होईल.”

 

सध्‍या १८व्‍या वर्षामध्‍ये असलेल्‍या ब्रँड आय१० तीन पिढ्यांसह विकसित झाली आहे – आय१०, ग्रँड आय१० व ग्रँड आय१० एनआयओएस, तसेच सध्‍या ३ पॉवरट्रेन पर्यायांसह येते, जसे १.२ लीटर कप्‍पा पेट्रोल मॅन्‍युअल, १.२ लीटर कप्‍पा पेट्रोल एएमटी आणि १.२ लीटर बाय-फ्यूएल कप्‍पा पेट्रोलसह सीएनजी. एचएमआयएलने भारतात वर्षाला सरासरी १ लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे, ज्‍याचे श्रेय वेईकलची लोकप्रियता आणि व्‍यावहारिकतेला जाते.

 

ब्रँड आय१० ची उत्‍क्रांती

 

एचएमआयएलने २००७ मध्‍ये भारतात ब्रँड आय१० लाँच केली. या वेईकलमध्‍ये ड्युअल एअरबॅग्‍ज, एबीएस व कीलेस एण्‍ट्री अशी अनेक आकर्षक वैशिष्‍ट्ये आहेत. वर्षानुवर्षे ब्रँड भारतातील ग्राहकांच्‍या अपेक्षा व महत्त्वाकांक्षांनुसार सतत विकसित झाला आहे, तसेच त्‍याच्‍या सेगमेंटमध्‍ये मापदंड स्‍थापित करत आहे.

 

सध्‍याच्‍या जनरेशनमध्‍ये मॉडेल ऑफरिंगमध्‍ये अधिक वाढ करण्‍यात आली आहे, ज्‍यामध्‍ये अनेक सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सहा एअरबॅग्‍ज, एबीएस (अॅण्‍टी-लॉक ब्रेकिंग सिस्‍अम) सह ईबीडी, ३-पॉइण्‍ट सीट बेल्‍ट आणि सर्व सीट्ससाठी प्रमाणित म्‍हणून सीटबेल्‍ट रिमाइंडर, तसेच आधुनिक वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (टीपीएमएस) – हायलाइन, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), एलईडी डेटाइम रनिंग लॅम्‍प्‍स (डीआरएलएस), क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, २०.२५ सेमी (८ इंच) टचस्क्रिन डिस्‍प्‍ले ऑडिओसह अँड्रॉइड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले.

 

कस्‍टमर प्रोफाइल

 

ह्युंदाई ग्रँड आय१० एनआयओएस भारतातील कुटुंबांसाठी योग्‍य पहिली कार आहे. आर्थिक वर्ष २४-२५ मध्‍ये ह्युंदाई ग्रँड आय१० एनआयओएसचे ४५ टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहक पहिलेच कार खरेदीदार होते. हे मॉडेल पसंतीची फॅमिली चॉईस आहे, जेथे ग्रँड आय१० एनआयओएसचे ८३ टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहक विवाहित आहेत. ग्रँड आय१० एनआयओएस देशभरात अत्‍यंत लोकप्रिय असली तरी गुजरात, महाराष्‍ट्र आणि हरियाणा या वेईकलच्‍या टॉप तीन बाजार

पेठा आहेत.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments