Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोनाटा गोल्ड' यंदाच्या अक्षय तृतीयेला सोनाटाने रचली सोन्याच्या भेटवस्तूंची नवी व्याख्या ...

सोनाटा गोल्ड’ यंदाच्या अक्षय तृतीयेला सोनाटाने रचली सोन्याच्या भेटवस्तूंची नवी व्याख्या सोनाटाचे नवे वॉच कलेक्शन – आधुनिक कारीगरी आणि २२ कॅरेट सोन्याबद्दलचे प्रेम यांचा उत्तम मिलाप

राष्ट्रीय, 28 एप्रिल, 2025: भारतातील सर्वाधिक पसंतीचा वॉच ब्रँड, सोनाटाने प्रस्तुत केले आहे – ‘सोनाटा गोल्ड’. अतिशय स्टायलिश व विचारपूर्वक तयार करण्यात आलेले हे कलेक्शन, सोन्याचा अनुभव घेण्याच्या आपल्या पद्धतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणते. फॉर्म आणि फंक्शन यांना एकत्र आणणारे ‘सोनाटा गोल्ड’ म्हणजे तुम्हाला अतिशय आवडणारे सोने परिधान करण्याचा एक नवा, प्रभावी मार्ग आहे. हे कलेक्शन म्हणजे फक्त परंपरा नाही तर तुमचे स्वतःचे स्टाईल स्टेटमेंट आहे.

 

 

 

अक्षय तृतीया म्हणजे समृद्धी आणि सकारात्मक आरंभाचा शुभ दिवस जवळ येत आहे. या शुभ मुहूर्तावर सोन्याची भेटवस्तू हवी असेल तर ‘सोनाटा गोल्ड’ हा उत्तम आधुनिक पर्याय आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या डायलमध्ये अस्सल ०.१५ ग्रॅमचे २२ कॅरेटचे तनिष्क सुवर्ण नाणे आहे, या नाण्याचे तेज कारीगरी, वारसा आणि डिझाईन याविषयी बरेच काही सांगते.

 

 

 

अतिशय नजाकतीने घडवण्यात आलेले बारकावे ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हे कलेक्शन अगदी योग्य आहे, सुबक केस डिझाईनपासून एम्बेडेड सोन्याचे नाणे असलेल्या लॅकर्ड हाय-पोलिश ब्लॅक डायलच्या विरोधाभासातून उठून दिसणाऱ्या सौंदर्यापर्यंत सर्व काही अतिशय विचारपूर्वक आणि कलात्मक पद्धतीने रचले गेले आहे. अस्सल लेदर स्ट्रॅप लक्षवेधी आणि तरीही भपका नसलेले सौंदर्य प्रदान करतो.

 

 

 

सोनाटाचे ब्रँड हेड श्री प्रतीक गुप्ता यांनी नवीन कलेक्शनविषयी सांगितले, “सोनाटा गोल्ड हे फक्त घड्याळ नाही तर एक अनुभव आहे. प्रीमियम, प्रत्येक काळात आवडेल आणि तरीही ट्रेंडमध्ये कायम आघाडीवर राहील असे कलेक्शन आम्हाला तयार करायचे होते. ही घड्याळे अशांसाठी आहेत जे डिझाईनला महत्त्व देतात, सोन्याची सौम्य आणि तरीही प्रभावी अभिव्यक्ती तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी.”

 

 

 

पुरुष आणि महिलांसाठीच्या दोन शानदार प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या ‘सोनाटा गोल्ड’ च्या किमती ५६९५ ते ५९९५ रुपयांदरम्यान आहेत. स्वतः स्वतःला दिलेली खास भेट असो, काळ कितीही पुढे गेला तरी कायम आवडत राहील अशी स्टाईल म्हणून केलेली खरेदी असो किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी अगदी विचारपूर्वक केलेली कृती म्हणून असो, यंदाच्या सणासुदीच्या काळात ‘सोनाटा गोल्ड’ ही तुमची सर्वोत्कृष्ट खरेदी ठरेल यात काहीच शंका नाही. www.sonatawatches.in या वेबसाईटवर, अधिकृत डीलर्स, टायटन वर्ल्ड आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर हे नवे कलेक्शन उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments