Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला मोगऱ्याच्या फुलांचा महाअभिषेक* *श्री महालक्ष्मी मंदिर...

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला मोगऱ्याच्या फुलांचा महाअभिषेक* *श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्या वतीने आयोजन ; मोग-यासह सुवासिक फुलांनी सजले महालक्ष्मी मंदिर*

पुणे : अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोगऱ्याच्या हजारो फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री महालक्ष्मी देवीला मोगऱ्याचा पुष्प पोशाख परिधान करण्यात आला होता. मंदिराचा गाभारा व सभामंडपात विविधरंगी फुलांची आरास आणि मोग-याच्या लाखो सुवासिक फुलांचा गंध अनुभविण्याकरिता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आयोजित मोगरा महोत्सवाचे. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी मंदिरात देखील फुलांची आरास करण्यात आली.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १०० किलो मोगरा, गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, तगर, झेंडू, कार्नेशियन, आॅर्किड यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. मंदिरातील तिन्ही देवींसमोर नैवेद्य देखील दाखवण्यात आला. फुलांची आरास पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. ही आरास बुधवार, दि. ३० एप्रिल पर्यंत सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments