मुंबई, 30 एप्रिल 2025: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची पूर्ण मालकीची उपकंपनी NPCI भारत बिलपे (NBBL) ने एअरटेल पेमेंट्स बँकेसोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून बँकेच्या रुपे ऑन-द-गो कार्डसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सह रिचार्ज करता येईल. भारत कनेक्ट (BBPS) प्लॅटफॉर्मवरील या एकत्रीकरणामुळे, कोणत्याही भारत कनेक्ट-सक्षम ऍप्स वापरून ग्राहक त्यांचे कार्ड सोयीस्करपणे टॉप अप करू शकतात.
भारतातील अनेक शहरांमध्ये हा NCMC उपक्रम सार्वजनिक व्यवहार तसेच वाहतूक व्यवस्था सुलभ करतो. हे एकाच कार्डवर प्रवाशांना महानगरे आणि बसेसमध्ये एक त्रास-मुक्त आणि संपर्करहित अनुभव देतात. रोजच्या प्रवाशांना रिचार्ज पॉइंट्सवर लांबलचक रांगेत थांबावे लागू नये हा या एकत्रीकरणाचा उद्देश आहे. ग्राहकांना अधिक सुविधा देताना हा उपक्रम कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देतो.
ग्राहक त्यांच्या पसंतीच्या भारत कनेक्ट-सक्षम ऍप्लिकेशनद्वारे ‘एनसीएमसी रिचार्ज’ पर्याय निवडून आणि एअरटेल पेमेंट्स बँक निवडून त्यांचे एअरटेल पेमेंट्स बँक रुपे ऑन-द-गो कार्ड रिचार्ज करू शकतात. यासाठी ते त्यांचा मोबाइल नंबर आणि त्यांच्या कार्डचे शेवटचे चार अंक टाकू शकतात. त्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्मवर विद्यमान शिलकीसह किमान आणि कमाल रिचार्ज रक्कम दाखवली जाईल. मोबाइल नंबरचा वापर केल्याने केवळ सोयच होत नाही तर संभाव्य सुरक्षा धोके देखील कमी करतो, ज्यामुळे इकोसिस्टमवरील भार कमी होतो. यामुळे कार्डाच्या तपशीलासारखी संवेदनशील माहिती बाहेर जात नाही.
ग्राहक भारत कनेक्ट-सक्षम प्लॅटफॉर्मद्वारे एनसीएमसीने सक्षम केलेले त्यांचे एअरटेल पेमेंट्स बँक रुपे ऑन-द-गो कार्ड 2,000 रुपयांपर्यंत टॉप अप करू शकतात. यशस्वी रिचार्ज झाल्यानंतर, ग्राहक नियुक्त टर्मिनलवर त्यांचे कार्ड टॅप करून त्यांची शिल्लक अपडेट करू शकतात. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी), नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनसीआरटीसी) आणि गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन सारख्या प्रमुख मेट्रो मार्गांव्यतिरिक्त, हे कार्ड राज्यातील बसमध्ये देखील वापरले जाऊ शकतात.
या नवीन घडामोडीबद्दल एनबीबीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुश्री नूपूर चतुर्वेदी म्हणाल्या, “भारत कनेक्ट प्लॅटफॉर्मवर एनसीएमसीसह सक्षम एअरटेल पेमेंट्स बँकेच्या रुपे ऑन-द-गो कार्ड्सचे एकत्रीकरण जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्डधारक लांब रांगा टाळू शकतात आणि त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही पेमेंट ऍपचा वापर करून त्यांचे एनसीएमसी वॉलेट त्वरित आणि सुरक्षितपणे टॉप अप करू शकतात. भारत कनेक्ट प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेमुळे डिजिटल पेमेंट सुलभ करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.”
एअरटेल पेमेंट्स बँकेचे चिफ ऑपरेटिंग अधिकारी श्री. गणेश अनंतनारायणन म्हणाले, “आमच्या ग्राहकांना अनेक उत्तमोत्तम सुविधा देऊन, अखंड रिचार्ज सक्षम करण्यासाठी एनपीसीआय भारत बिलपे सोबत सहयोग करण्यास आम्हाला आनंद होत आहे. या सहकार्यामुळे वापरकर्त्यांना एनसीएमसीसह सक्षम केलेले त्यांचे एअरटेल पेमेंट्स बँक रुपे ऑन-द-गो कार्ड कोणत्याही भारत कनेक्ट-सक्षम ऍपद्वारे सहजतेने टॉप अप करण्याची परवानगी मिळते.


