*
• शहरी भारताचा प्रोटेक्शन कोशंट विक्रमी ४८ टक्के उंचीवर, टर्म इन्शुरन्सचा जास्तीत जास्त अंगीकार आणि वाढत्या डिजिटल प्रभावामुळे प्रेरित.
• आयपीक्यू १.० मध्ये आर्थिक सुरक्षा ६५% वरून ६८% वर. कोविडमधील उच्चांकही मागे टाकला.
• ४ पैकी ३ शहरी भारतीय आता प्रीमियमच्या तुलनेत कव्हरला जास्त महत्त्व देतात.
• जेन झी शक्तिशाली मिड टर्म आर्थिक नियोजनासह आघाडीवर; तिघांपैकी दोघांकडे जीवनविमा आहे
• दक्षिण भारत सर्वाधिक संरक्षित; पश्चिमेकडील राज्यांमध्ये विक्रमी ४१% टर्म इन्शुरन्सची नोंद
• लिंगाधारित दरी रूंदावली: कार्यरत पुरूषांचा आयपीक्यू ५० च्या वर, कार्यरत महिलांचा आयपीक्यू फक्त ४८
नवी दिल्ली ५ मे २०२५: अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लि. {पूर्वीची मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड} (“अॅक्सिस मॅक्स लाइफ”/ “कंपनी”)ने कंटार या जगातील आघाडीच्या मार्केटिंग डेटा आणि विश्लेषण कंपनीच्या मदतीने पार पाडलेल्या आपल्या मालकीच्या इंडिया प्रोटेक्शन कोशंट सर्व्हे (आयपीक्यू) च्या सातव्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले आहेत. या सर्वेक्षणाद्वारे २५ भारतीय शहरांमधील ६३६० घरांमध्ये सर्वेक्षण केले असून त्यातून आर्थिक संरक्षणाबाबत शहरी भारताची नस समजून घेतली गेली आहे.
अॅक्सिस मॅक्स लाईफ ‘भरोसा टॉक्स’ या कथेअंतर्गत इंडिया प्रोटेक्शन कोशंट ७.० आणत आहे. यातून भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक आणि संरक्षण मानसिकतेवर प्रकाश टाकला जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे अॅक्सिस मॅक्स लाईफचे उद्दिष्ट शहरी, ग्रामीण, पगारदार, गिग कामगार आणि निवृत्त लोकसंख्येतील खरे आवाज समजून घेणे हे आहे. ते भारताची जनता संरक्षण, नियोजन आणि दीर्घकालीन सुरक्षिततेकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते याबद्दल प्रामाणिक माहिती देते. काळाच्या ओघात आर्थिक चिंता बदलत असताना आणि आकांक्षा विकसित होत असताना भरोसा टॉक्स उद्योग, नियामक आणि धोरणकर्त्यांसाठी ग्राहकांचे बदलते प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा आधार म्हणून काम करेल.
आयपीक्यू ७.० नुसार, शहरी भारतातील संरक्षण गुणांक ४८ वर पोहोचला आहे, जो २०१९ मध्ये ३५ होता, जो देशाच्या आर्थिक तयारीत सतत प्रगती दर्शवितो. जीवन विम्याची मालकी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे, ७८% शहरी भारतीयांकडे एक किंवा अधिक उत्पादने आहेत, तर ज्ञान निर्देशांक दोन अंकांनी वाढून ६३ वर पोहोचला आहे, जो जीवन विम्याबद्दल जागरूकता आणि समज वाढल्याचे दर्शवितो.
आयपीक्यू ७.० नुसार देशाच्या आर्थिक तयारीतील सातत्यपूर्ण प्रगती दर्शवणारा शहरी भारतातील संरक्षण निर्देशांक ४८ वर पोहोचला आहे. तो २०१९ मध्ये ३५ होता. जीवन विम्याची मालकी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली असून ७८% शहरी भारतीयांकडे एक किंवा अधिक उत्पादने आहेत, तर नॉलेज इंडेक्स दोन अंकांनी वाढून ६३ वर पोहोचला आहे. त्यातून जीवन विम्याबद्दल जागरूकता आणि समज वाढल्याचे दिसते.
जागतिक साथीनंतरच्या दुरूस्ती टप्प्यात शहरी भारताची आर्थिक सुरक्षा ६८% वर गेली असून तिने जागतिक साथीपूर्वीच्या ६६% या (आयपीक्यू १.०) सर्वोच्च टप्प्याला मागे टाकले आहे आणि साथीच्या काळातील ५७% या नीचांकी टप्प्यापासून ती दुरूस्त होत आहे. मागच्या सात वर्षांत प्रथमच ‘प्रीमियम’ऐवजी ‘कव्हर’ने जीवनविमा खरेदीच्या संदर्भात महत्त्वाचे स्थान पटकावले असून ४ शहरी प्रतिसादकांपैकी तिघांनी खर्चाच्या तुलनेत कव्हरला महत्त्व दिले आहे.
आयपीक्यू ७.० मध्ये महानगरांमध्ये जीवन विम्याच्या मालकीमध्ये तीन गुणांनी वाढ (आयपीक्यू ६.० मधील ८३ वरून आयपीक्यू ७.० मध्ये ८६) आणि आर्थिक सुरक्षिततेची भावना सुधारल्यामुळे (आयपीक्यू ६.० मधील ६९% वरून आयपीक्यू ७.० मध्ये ७१%) संरक्षण निर्देशांकात ३-अंकी वाढ दिसून आली आहे. टियर-१ शहरांमध्ये नॉलेज इंडेक्स (आयपीक्यू ६.० मधील ५८ वरून आयपीक्यू ७.० मध्ये ६२), लाइफ इन्शुरन्स ओनरशिप (आयपीक्यू ६.० मधील ७३% वरून आयपीक्यू ७.० मध्ये ७७%) आणि सुरक्षा पातळी (आयपीक्यू ६.० मधील ६३% वरून आयपीक्यू ७.० मध्ये ६७%) अशा निकषांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.
अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत त्रिपाठी म्हणाले की, “इंडिया प्रोटेक्शन कोशंट ‘भरोसा टॉक्स’चा भाग म्हणून भारताच्या आर्थिक लवचिकतेचे एक शक्तिशाली निर्देशांक ठरले आहे. ते भारताच्या विम्याच्या क्षेत्रातील यशोगाथेला नेण्यासाठी प्रेरणा ठरते. यांदाचा विक्रमी प्रोटेक्शन कोशंट सर्वकालीन उच्च जीवन विमा मालकीसह, ग्राहकांच्या प्राधान्यांमध्ये खर्चाबाबत संवेदनशीलतेपासून खऱ्या संरक्षण गरजांपर्यंत निर्णायक बदल दर्शवतो. तरीही आर्थिक सुरक्षेतील वाढत्या लिंगभेदामुळे सखोल, अधिक समावेशक हस्तक्षेपांची आवश्यकता आहे. अॅक्सिस मॅक्स लाइफमध्ये आम्ही ही गती आणि जागरूकता वाढवण्यासाठी व संरक्षित भारताची संकल्पना अधिक खोलवर रूजवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
संपादकांसाठी माहिती:
इंडिया प्रोटेक्शन कोशंट ७.० चे खालील निष्कर्ष शहरी भारताच्या आर्थिक तयारीबाबतच्या दृष्टीकोन आणि विचारांतील बदल दर्शवतात:
A) शहरी भारतीयांची आर्थिक सज्जता
शहरी भारताचा प्रोटेक्शन कोशंट ४८ वर; लाइफ इन्शुरन्सची मालकी ७८% वर सर्वाधिक
आर्थिक तयारीमध्ये शहरी भारताचा प्रवास सुरूच आहे. संरक्षण गुणांक आयपीक्यू १.० मध्ये ३५ वर होता तो आता आयपीक्यू ७.० मध्ये ४८ पर्यंत वाढला आहे. जीवन विमा मालकी ७८% च्या नवीन उच्चांकावर पोहोचली आहे. ती जीवन विमा उत्पादनांची वाढती स्वीकृती आणि विश्वास दर्शवते. नॉलेज इंडेक्सनेही सातत्यपूर्ण प्रगती दर्शविली आहे. अद्ययावत आवृत्तीत आयपीक्यू १.० च्या ३९ वरून ६३ पर्यंत वाढ झाली आहे – यातून ग्राहकांमध्ये सखोल जागरूकता आणि समज दिसते. जागतिक साथीनंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यातील सुरक्षा पातळी आता कोविडपूर्व आकडेवारीला मागे टाकून ६८% पर्यंत पोहोचली आहे. ती साथीच्या काळात ५७% पर्यंत घसरली होती. हे ट्रेंड केवळ पुनर्प्राप्तीच नव्हे तर शहरी भारतातील दीर्घकालीन आर्थिक संरक्षणावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचे प्रतिबिंबित करतात.
शहरांच्या श्रेणीत आर्थिक संरक्षणात मोठी वाढ; दक्षिण विभाग आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक सुसज्ज
दक्षिण भारताने आपली सात वर्षांची आघाडी कायम ठेवली आहे. ती वाढता मुदत विमा (३३% ते ३७%) आणि बचत उत्पादन मालकी (४२% ते ४६%) यामुळे प्रेरित आहे. पश्चिम भारताने ही तफावत लक्षणीयरीत्या कमी केली आहे. आयपीक्यू इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक मुदत योजना मालकी टप्पा (४१%) गाठला आहे. उत्तरेकडील राज्यांनी चांगल्या मुदत योजना अंगिकाराद्वारे (२८% ते ३१%) त्यांच्या संरक्षण कोशंटमध्येही सुधारणा केली आहे. तथापि, वाढती जागरूकता (५३% ते ५७%) असूनही पूर्वेकडील राज्यांच्या मालकीच्या आकडेवारीत स्थैर्य असून ती पिछाडीवर आहेत. महानगरे, टियर १ आणि टियर २ शहरांसह शहर-वर्गांमध्ये जीवन विमा मालकीमध्ये लक्षणीय वाढ दिसत असून विशेषतः टियर २ शहरांमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आली आहे (जीवन विमा मालकीमध्ये ६२% ते ६६%). त्यामुळे शहरी केंद्रबिंदूच्या बाहेर जीवनविम्याचा अंगीकार वाढल्याचे दिसते.
मुलांचे भविष्य आर्थिक नियोजनासाठी कारण ठरते
मुलांच्या शिक्षणासाठी बचत (६१%) आणि लग्नाचा खर्च (४४%) हे शहरी भारतातील आर्थिक प्राधान्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. आयपीक्यू ६.० च्या तुलनेत या दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ती कुटुंब-केंद्रित आर्थिक नियोजनासाठी वाढती वचनबद्धता अधोरेखित करते. निवृत्ती नियोजन (३७%) आणि घर खरेदी (३६%) ही पुढील मोठी उद्दिष्टे आहेत. हा बदल अल्पकालीन किंवा विवेकाधीन खर्चापेक्षा दीर्घकालीन स्थैर्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे संकेत देतो.
B) मुदत विम्याबाबत शहरी दृष्टीकोन
मुदत विम्याबाबतची जागरूकता ७४% पर्यंत वाढली परंतु ४ पैकी एकाला यासंदर्भात चिंता आहे
मुदत विम्याची जागरूकता आणि मालकीमध्ये लक्षणीय वाढ झाली असली तरी अनुक्रमे ७०% वरून ७४% आणि ३१% ते ३४% पर्यंत लोकांना जास्त प्रीमियममुळे हा विमा खरेदी करण्यात अडचणी येतात. जवळजवळ ४ पैकी १ व्यक्तीकडे मुदत विमा परवडण्याची क्षमता हा एक महत्त्वाचा अडथळा आहे. त्यात पैशांची कमतरता हा अडथळा असल्याचे सांगणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे (२१% ते २५%). बचत आणि युलिप उत्पादनांमध्येही जागरूकता आणि मालकीमध्ये थोडीशी वाढ दिसून आली आहे. परंतु सुलभता सुधारणे आणि आर्थिक अडचणी दूर करणे हे व्यापक टर्म प्लॅन स्वीकारण्यास चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे या डेटामधून दिसते.
वाजवी दर आणि सुलभता यांच्यामुळे ऑनलाइन खरेदी माध्यमे महत्त्वाचा पाया रचतात
मुदत विमा खरेदीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म पसंतीचा पर्याय म्हणून उदयास येत आहेत. त्यात आयपीक्यू ६.० मधील १८% वरून आयपीक्यू ७.० मध्ये २२% पर्यंत वाढ झाली आहे. डिजिटल चॅनेलचे आकर्षण त्याचे वाजवी दर, पॉलिसीबाबत व्यापक माहितीची उपलब्धता आणि जलद, अधिक सोयीस्कर व्यवहारांमध्ये आहे. तुलना करण्याची सोय आणि सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे ऑनलाइन खरेदी आजच्या डिजिटली जाणकार विमा खरेदीदारांसाठी जलद गतीने एक लोकप्रिय पर्याय बनत आहे.
४ पैकी ३ लोक खर्चापेक्षा कव्हरला जास्त महत्त्व देतात. ५६% लोकांना आपल्या विम्याच्या संरक्षणाची खात्री आहे
सात आवृत्त्यांमध्ये प्रथमच मुदत जीवनविमा खरेदीसाठी प्रीमियमच्या तुलनेत कव्हर जास्त महत्त्वाचे ठरले आहे. आता ४ पैकी ३ व्यक्ती खर्चापेक्षा कव्हरला प्राधान्य देत आहेत. याव्यतिरिक्त ५६% प्रतिसादकर्त्यांच्या मते त्यांची सध्याची मुदत योजना त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी पुरेसे संरक्षण देते.
C) लोकसांख्यिक माहिती
स्त्री आणि पुरूषः कार्यरत पुरूषांचा आयपीक्यू वेगाने वाढतो तर कार्यरत महिलांचा आयपीक्यू वाढत्या आर्थिक चिंतांमुळे मध्यम स्वरूपात वाढतो
यावर्षी कमावत्या पुरुष आणि महिलांमध्ये संरक्षण पातळीत तफावत दिसून येते. पुरुषांचा संरक्षण सहभाग ५० पर्यंत वाढला (४७ वरून), तर काम करणाऱ्या महिलांचा संरक्षण सहभाग ४८ वरच राहिला. महिलांनी निवृत्ती, मुलांचे शिक्षण आणि लग्न यासारख्या महत्त्वाच्या जीवनातील टप्प्यांसाठी कमी आर्थिक सुरक्षितता नोंदवली. महागाई, वैद्यकीय खर्च आणि कमावत्या व्यक्तीच्या नुकसानाबद्दलच्या त्यांच्या वाढत्या चिंता लिंग-संवेदनशील आर्थिक धोरणांची आवश्यकता अधोरेखित करतात.
जेन झी आणि नॉन मिलेनियल्स: उत्तम मध्यम कालावधीतील आर्थिक नियोजनासह जेन-झीची आघाडीः तिघांपैकी दोघांकडे जीवनविमा आहे
जेन झी हा एक उत्कृष्ट गुंतवणूकदार गट म्हणून उदयास आला आहे. त्यांची संरक्षण टक्केवारी ४१ आहे, दोन तृतीयांश लोक जीवन विमा उत्पादने खरेदी करतात. ते घर, कार खरेदी करणे किंवा सुट्टीचे नियोजन करणे यासारख्या मध्यावधी उद्दिष्टांकडे कल दर्शवितात. उद्देशपूर्ण नियोजनात ते नॉन-मिलेनियलपेक्षा जास्त आघाडीवर आहेत. त्यांचे शिस्तबद्ध बचत वर्तन आणि गुंतवणूक करण्याची तयारी आर्थिक स्वातंत्र्याची वाढती भावना आणि जीवनशैली आणि सुरक्षिततेचे संतुलन साधण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन दर्शवते.
वेतनदार आणि स्वयंरोजगारितः वेतनदार वर्ग प्रोटेक्शन कोशंटमध्ये आघाडीवर तर स्वयंरोजगारित सुरक्षा घेऊ इच्छितात परंतु विम्याच्या खरेदीत पिछाडीवर आहेत
ज्ञान, मालकी आणि सुरक्षिततेतील वाढीमुळे पगारदार व्यक्ती ५२ च्या संरक्षण कोशंटसह आघाडीवर आहेत. स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी मुदत विमा मालकी २ अंकांनी वाढली. ती सुधारित आर्थिक आत्मविश्वास आणि बाजाराशी संबंधित उत्पादनांचा स्वीकार यामुळे वाढली. तथापि, बचत क्षमतांमध्ये घट झाली. घरगुती बजेटमधून बचत करण्याच्या क्षमतेत ३ अंकांची घट झाली. त्यामुळे या विभागातील चालू आर्थिक ताण अधोरेखित झाला.
येथे वाचाः https://www.axismaxlife.com/maxlife-ipq
इंडिया प्रोटेक्शन कोशंटबाबत
२०१९ मध्ये स्थापन झालेला इंडिया प्रोटेक्शन कोशंट हा अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सचा वार्षिक मालमत्ता प्रकल्प आहे. तो कंटारच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश आर्थिक संरक्षण क्षेत्रात भारतीय ग्राहकांची नस समजून घेणे आहे. जीवन विम्याचा सर्वात मूलभूत आणि किफायतशीर प्रकार म्हणून टर्म इन्शुरन्सचा वापर वाढवणे हा आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश शहरी भारतीयांची सध्याची आर्थिक सुरक्षा पातळी, बदलत्या बचत आणि गुंतवणूक पद्धती, समकालीन जगात आर्थिक संरक्षणाचे प्रमुख प्रश्न आणि ट्रिगर्स या संदर्भात स्थिती जाहीर करणे आहे. इंडिया प्रोटेक्शन कोशंट हे अॅक्सिस मॅक्स लाईफने कंटारच्या भागीदारीत विकसित केलेले एक मालकीचे साधन आहे जे भारतीयांना भविष्यातील अनिश्चिततेपासून ० ते १०० च्या प्रमाणात किती प्रमाणात सुरक्षित वाटते हे मोजण्यासाठी आहे. हे भविष्यातील अनिश्चितता, जागरूकता आणि जीवन विमा उत्पादन श्रेणी (टर्म, एंडोमेंट आणि युलिप) बद्दलच्या वृत्ती, मानसिक तयारी आणि मालकी यावर आधारित आहे.
घोषणापत्र:
हा अभ्यास सर्वोच्च २५ महानगरे, टियर १ आणि टियर २ शहरांमध्ये केला गेला आहे; म्हणून, त्याचे निष्कर्ष केवळ शहरी भारतातील मेट्रो, टियर १ आणि टियर २ शहरांचे प्रतिनिधित्व करतात.
• महानगरे– दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई
• टियर १– लुधियाना, जयपूर, लखनौ, पाटणा, भुवनेश्वर, विझग, अहमदाबाद, भोपाळ, पुणे
• टियर २– डेहराडून, मुरादाबाद, गुवाहाटी, बोकारो, कोल्हापूर, जामनगर, रायपूर, उज्जैन, हुबळी- धारवाड, तिरूचिरापल्ली
• आयपीक्यू ७.० विरूद्ध आयपीक्यू ६.० माहितीची तुलना फक्त २५ बाजारपेठांमध्ये केली गेली आहे [६ महानगरे, ९ टियर १ आणि १० टियर २]
• अभ्यासाचे कोणतेही निष्कर्ष काढण्यासाठी किमान नमुना २७०चा असून त्यातील त्रुटीचे प्रमाण +-५.९६४ आहे.
या सर्वेक्षणातून गोळा केलेली माहिती आणि त्यात प्रकाशित झालेले निकाल हे फक्त सर्वसाधारण माहिती आणि मार्गदर्शनाच्या हेतूने आहेत. या सर्वेक्षणाचा वापर किंवा त्यातील निकालामुळे काहीही नुकसान, दोष किंवा निर्णय घेतले गेल्यास त्यासाठी अॅक्सिस मॅक्स लाइफ कोणतेही उत्तरदायित्व स्वीकारत नाही.
अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सबाबत
अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड जिला पूर्वी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जात असे, हा मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (“एमएफएसएल”) आणि अॅक्सिस बँक लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स आपल्या मल्टी-चॅनेल वितरणाद्वारे व्यापक संरक्षण आणि दीर्घकालीन बचत जीवन विमा उपाय देते. त्यात एजन्सी आणि तृतीय-पक्ष वितरण भागीदारांचा समावेश आहे. गरजेवर आधारित विक्री प्रक्रिया, गुंतवणूक आणि सेवा वितरणासाठी ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ भांडवल याद्वारे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ आपल्या उद्योग उभारला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक आकडेवारीनुसार अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सने २९,५२९ कोटी रुपयांचा एकूण लेखी प्रीमियम मिळवला आहे.
कंटारबाबत
कंटार हा जगातील आघाडीचा मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स उद्योग आहे आणि जगातील सर्वोत्तम कंपन्यांचा एक महत्त्वाचा ब्रँड भागीदार आहे. लोकांच्या विचार करण्याची व वर्तनाची पद्धत उलगडण्यासाठी आम्ही सर्वात अर्थपूर्ण वृत्ती आणि वर्तन डेटा सखोल कौशल्य आणि प्रगत विश्लेषणांसह गोळा करतो. आम्ही ग्राहकांना काय घडले आहे आणि का घडले आहे व त्यांचे भविष्य घडवणाऱ्या मार्केटिंग धोरणांना कशा प्रकारे आकार द्यायचा हे समजून घेण्यास मदत करतो.
###


