Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorized'क्षण' आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन रविवारपासून (दि.११)* *स्टारविन्स फाउंडेशन च्या वतीने आयोजन...

‘क्षण’ आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन रविवारपासून (दि.११)* *स्टारविन्स फाउंडेशन च्या वतीने आयोजन : जगभरातून निवडक १५१ छायाचित्रांचा समावेश*

पुणे : निसर्ग सौंदर्य, विविध ऋतू, ऐतिहासिक ठिकाणे आणि सण उत्सवांचे प्रतिबिंब छायाचित्रांच्या माध्यमातून उमटवणा-या जगभरातील छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘क्षण’ हे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. स्टारविन्स फाउंडेशन च्या वतीने दिनांक ११ ते १७ मे दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शन होत असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणव तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला राज लोखंडे व कौशिक कुलकर्णी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार, दिनांक ११ मे सायंकाळी ५ वाजता पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनासाठी देश-विदेशातून छायाचित्रे आलेली आहेत. जर्मनी, यूएसए, कॅनडा, युनायटेड किंगडम, यांसह भारतातून कलकत्ता, आगरताळा, बंगळूरू, चेन्नई, मुजफ्फराबाद, राजस्थान, कोल्हापूर तसेच विविध शहरातून देखील छायाचित्रे आलेली आहेत.

प्रदर्शनाचे यंदा १० वे वर्ष आहे. एकूण ५५० हून अधिक चित्रे प्रदर्शनाकरिता विविध ठिकाणांहून छायाचित्रकारांमार्फत पाठवण्यात आली होती. त्यातील निवडक १५१ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. या अंतर्गत स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असून विजेत्यांना पारितोषिके देखील दिली जातात. दरवर्षी या प्रदर्शनाला विविध ठिकाणांहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-यांना ‘क्षण’ पुरस्काराने देखील गौरविले जाते. यावर्षी दि.११ मे रोजी प्रदर्शन उद्घाटनानंतर कलाक्षेत्रातील सौरभ गोखले, व्यवसाय क्षेत्रातील शेखर मते, छायाचित्रण क्षेत्रात दिलीप आणि प्रतिभा गोरे, सामाजिक क्षेत्रात पियुष शहा आणि क्रीडा क्षेत्रात साहिल मुजावर यांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दिग्दर्शक सागर वंजारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन दि. १७ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments