Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेएसबी लिमिटेडला न्युक्लिअर पंप्सच्या निर्यातीसाठी प्रतिष्ठित ऑर्डर प्राप्त

केएसबी लिमिटेडला न्युक्लिअर पंप्सच्या निर्यातीसाठी प्रतिष्ठित ऑर्डर प्राप्त

पुणे,9 मे 2025 : केएसबी लिमिटेडला आपली मुख्य कंपनी केएसबी एसई ॲन्ड कंपनी, KGaA जर्मनी (केएसबी SE जर्मनी) कडून क्रिटिकल पंप्ससाठी लक्षणीय ऑर्डर प्राप्त झाली आहे.
केएसबी लिमिटेडला न्युक्लिअर पंप्ससाठी मिळालेली ही पहिली मोठी प्रतिष्ठित निर्यात ऑर्डर आहे. यामुळे कंपनीला प्रचंड निर्यात सामर्थ्य असलेल्या न्युक्लिअर पंप्स क्षेत्रात प्रवेश करून सेवा प्रदान करण्याची संधी मिळेल.
या ऑर्डर अंतर्गत युरोपमधील नव्याने बांधण्यात आलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लांटला दोन युनिटससाठी (युनिट 5 व युनिट 6) 8 क्रिटिकल सेफ्टी क्लास 2 पंप्सचा पुरवठा करायचा आहे.
ही ऑर्डर म्हणजे केएसबीची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता व सामर्थ्याचा पुरावा आहेच,पण त्याचबरोबर जागतिक पातळीवरच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याची कंपनीची कुशलता आणि क्षमता दर्शविते.

KSB लिमिटेडबद्दल:

KSB लिमिटेडची स्थापना १९६० मध्ये भारतात झाली आणि ही KSB SE & Co KGaA चा भाग आहे, जो जगातील आघाडीचे पंप, वाल्व्ह आणि सिस्टीम पुरवठादार आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवेसोबत, कंपनीने भारतीय ग्राहकांच्या विविध गरजांसाठी पंप, जल शुद्धीकरण, जल परिवहन, ऊर्जा, तेल, इमारत सेवा, प्रक्रिया अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि मजबूत उपाय प्रदान केले आहेत. आज केएसबी समूहाचे जगभरात असंख्य विक्री आणि विपणन कंपन्या, उत्पादन सुविधा आणि सेवा ऑपरेशन्स आहेत. १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक विक्री महसूल दोन अब्ज युरोच्या वर पोहोचलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments