Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedआरोग्य सेवा क्षेत्राला आकार देण्यामध्ये परिचरिकांची महत्वाची भूमिका

आरोग्य सेवा क्षेत्राला आकार देण्यामध्ये परिचरिकांची महत्वाची भूमिका

पुणे 12 मे 2025 :आरोग्य सेवा क्षेत्राला आकार देण्यामध्ये परिचरिकांची महत्वाची भूमिका आहे असे मत नर्सिंग तज्ज्ञांनी व्यक्त केले .

12 मे हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा केला जातो . यावर्षीची संकल्पना ‘आपले परिचारक आपले भविष्य- परिचरिकांची काळजी घेणे म्हणजे अर्थव्यवस्थेला बळकटी देणे’ ही आहे .

विश्वराज हॉस्पिटल लोणी येथील नर्सिंग विभागाच्या प्रमुख सारिका भोसले म्हणाल्या की एआय, रोबोटिक्स इत्यादी नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार, वैद्यकीय प्रक्रिया, शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर घेतली जाणारी काळजी यामधील प्रगती मुळे परिचरिकांना देखील सातत्याने प्रशिक्षण आणि कौशल्य विकास करणे महत्त्वाचे झाले आहे . रुग्णांच्या दैनंदिन काळजी बरोबरच, आरोग्यसेवा क्षेत्रातील बहुशाखीय विस्तार, प्रशासकीय कामकाज, शिक्षण आणि संशोधनामध्ये सहभाग यामुळे परिचरिकांच्या कामाचा देखील विस्तार झाला आहे .

त्यामुळेच कंटीन्युअस नर्सिंग एज्युकेशन ( सिएनई) सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व वाढले आहे .

त्यापुढे म्हणाल्या की आरोग्यसेवेतील वाढत्या गरजांमुळे अनेक आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या आहेत . एकीकडे भारत आणि भारताबाहेर अनेक संधी असल्यामुळे कर्मचारी टिकवून ठेवणे, इंटरनेट वर माहिती मिळवून विशिष्ट उपचारपद्धतींची अपेक्षा घेऊन आलेल्या रुग्णांशी संवाद साधणे ही आव्हाने आहेत, पण दुसरीकडे याच गोष्टींमुळे अनेक संधी निर्माण झाल्या आहेत . तरुण पिढीने नर्सिंगकडे एक करिअर म्हणून पाहावे , कारण यात अनेक संधींबरोबर रुग्णसेवेचे समाधान देखील मिळते.

वाढत्या मेडिकल टुरिझम मुळे जगाचे लक्ष भारतातील आरोग्यसेवेकढे आहे. गुणवत्ता पूर्ण सेवांसह देशातील आरोग्यसेवाक्षेत्राला आकार देण्यामध्ये परिचारिका महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे त्या म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments