Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेची अंतरा सीनियर केअरसोबत भागीदारी

भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेची अंतरा सीनियर केअरसोबत भागीदारी

अ‍ॅक्सिस बँक आपल्या सिल्व्हर लाइनिंग्ज प्रोग्रॅमच्या ग्राहकांसाठी होम केअर, केअर ॲट होम आणि AGEasy सारख्या अंतराच्या सीनियर केअर सेवा आणि उत्पादने सादर करणार

नवी दिल्ली, 15 मे 2025: भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने भारतातील ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि जीवनमान वाढवण्यासाठी अंतरा सिनियर केअर या भारतातील एकमेव एकात्मिक सिनियर केअर इकोसिस्टम आणि मॅक्स इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनीशी भागीदारी केली आहे. या सहयोगाच्या माध्यमातून, अंतरा आपली सर्वसमावेशक उत्पादने आणि सेवा सादर करेल. यामध्ये केअर होम्स, केअर ॲट होम आणि AGEasy या खास ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटप्लेसपर्यंतचा अॅक्सेस यांचा समावेश आहे. प्रदीर्घ आजारपणात आरोग्य सेवांचे व्यवस्थापन करणाऱ्या सेवा आणि उत्पादने यात आहेत. अ‍ॅक्सिस बँकेच्या सिल्व्हर लाइनिंग्ज प्रोग्रॅमच्या 20 लाखांहून अधिक ग्राहकांना या सेवा उपलब्ध होतील. वय वर्षे 60 पुढील ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम खासकरून डिझाईन करण्यात आला आहे.

अ‍ॅक्सिस बँकेची सिल्व्हर लाइनिंग्ज प्रोग्रॅम ही एक खास योजना ज्येष्ठ नागरिकांना प्रवास, आरोग्य आणि जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या बँकिंग उपायसुविधा आणि निवडक फायदे देते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आत्मविश्वासाने आर्थिक व्यवहार करण्यास आणि अधिक समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करते. अंतरा सीनियर केअर या भागीदारीच्या माध्यमातून आपली एकात्मिक सीनियर केअर इकोसिस्टीम अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. ही भागीदारी ज्येष्ठ नागरिकांना सुलभ, सन्मानपूर्वक आणि वैयक्तिकृत सेवा देण्यास सज्ज असून ती उत्कृष्टतेवर आणि ‘सेवाभाव’ या मूल्यावर आधारित आहे.

JLL-ASLI २०२४ च्या अहवालात सादर केलेल्या अंदाजांनुसार भारतामध्ये लोकसंख्यात्मक बदल होत असून, सध्या अंदाजे 150 दशलक्ष असलेली ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2050 पर्यंत अंदाजे 350 दशलक्ष होणार आहे. कुटुंब रचनेतील बदल, सुधारलेली आरोग्यसेवा आणि वाढलेले आयुर्मान ही या वाढीमागची प्रमुख कारणे आहेत. ज्येष्ठांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढत असून, सर्वांगीण आरोग्य आणि सक्रिय वृद्धत्वासाठीच्या सुविधांसाठीची मागणी वाढत आहे. अंतरा सीनियर केअर आणि अ‍ॅक्सिस बँक यांच्यातील भागीदारी ही ज्येष्ठ नागरिकांना सन्माननीय, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवण्याच्या सामायिक उद्दिष्टाचे प्रतीक आहे. ही भागीदारी ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक पायाभूत सुविधा आणि एक मजबूत परिसंस्था यांचा परिपूर्ण मिलाफ दर्शवते.

या भागीदारीविषयी बोलताना अ‍ॅक्सिस बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मुनीश शारदा म्हणाले, “आम्हाला अंतरा सीनियर केअर सोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. आमच्यासारखेच भारतातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सुवर्ण काळात सर्वोत्तम सेवा देण्याचे ध्येय त्यांचेही आहे. ही भागीदारी बँकेला आपल्या ग्राहकांसाठी केवळ आर्थिक उपायसुविधांच्या पलीकडे जात आरोग्य सेवा आणि आधार यांच्या स्वरूपात बरेच काही देण्यास सक्षम करेल. या सहयोगाद्वारे, आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक सर्वांगीण दृष्टिकोन पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यात वैयक्तिकृत बँकिंगपासून विश्वासार्ह होम केअर सेवांपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे.”

रजित मेहता, एमडी आणि सीईओ, अंतरा सीनियर केअर म्हणाले, “सिल्व्हर लाइनिंग्ज प्रोग्रॅम आणि भागीदार संस्थांच्या माध्यमातून सीनियर केअर साठी नाविन्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या बांधिलकीचे मोल आम्ही जाणतो. अ‍ॅक्सिस बँकसोबत मिळून आम्ही भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनमानात सुधारणा आणि आरोग्य वृद्धिंगत करणाऱ्या सर्वसमावेशक उपाययोजना तयार करत आहोत.”

“अंतरा मध्ये, आम्ही आपल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक, काळजीपूर्वक आणि विश्वासार्ह उपायांसह पाठबळ मिळावे यासाठी वचनबद्ध आहोत,” असे अंतरा असिस्टेड केअर सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ इशान खन्ना यांनी सांगितले. “सिल्व्हर लाइनिंग्ज प्रोग्रॅम ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा सर्वाधिक गरज असते अशावेळी अंतराच्या उच्च आरोग्य सेवा सुविधांशी सहज जोडण्याचा मार्ग उपलब्ध करून देतो. या सिल्व्हर लाइनिंग्ज प्रोग्रॅमच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आमच्या सेवा आणि उपाय सुविधा सहजपणे अनुभवू शकतात. त्यातून त्यांना आधार मिळत असल्याची खात्री होते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments