Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक*

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक*

*
पुणे, दि. 13 : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवरओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ कि.मी ७९/००० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments