Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेजतर्फे ब्लू अमोनिया ट्रान्सफर सोल्यूशन्ससह मध्यपूर्वेतील हरित उर्जेच्या ध्येयांना चालना

गोदरेजतर्फे ब्लू अमोनिया ट्रान्सफर सोल्यूशन्ससह मध्यपूर्वेतील हरित उर्जेच्या ध्येयांना चालना

कंपनीद्वारे जगातील सर्वात मोठ्या ब्लू अमोनिया उत्पादन केंद्रांपैकी एका केंद्रातील उर्जा निर्मिती वाढवण्यासाठी उच्च दाबाचे हीट एक्सचेंजर्सचा पुरवठा

मुंबई, 30 मे २०२५ – गोदरेज एंटरप्रायजेस समूहाच्या प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायाने मध्यपूर्वेत असलेल्या जगातील सर्वात ब्लू अमोनिया उत्पादन केंद्रांपैकी एका केंद्रासाठी महत्त्वाच्या एक्सचेंजर्सचा यशस्वी पुरवठा केला आहे. हरित उर्जा निर्मितीसाठी हातभार लावणाऱ्या या पुरवठ्यामुळे कंपनीची उच्च दर्जाच्या प्रोसेस इक्विपमेंट उत्पादन क्षेत्रातील क्षमता दिसून आली आहे. त्याचप्रमाणे हरित उर्जेकडे होत असलेल्या जगाच्या स्थित्यंतरातील कंपनीची लक्षणीय भूमिका अधोरेखित झाली आहे. अक्षय उर्जा आणि डिकार्बनायझेशनवर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित होत असताना कंपनीने धोरणात्मकपणे आपली क्षमता हायड्रोजन आणि अमोनिया उत्पादनासाठी लागणाऱ्या खास उपकरणांची मागणी पूर्ण करण्यासाठी वाढवली आहे.

गोदरेज एंटरप्रायजेसच्या प्रोसेस इक्विमेंट विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसैन शारियार म्हणाले, ‘हा प्रकल्प आमच्यासाठी प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायातील आणखी एक लक्षणीय टप्पा असून त्यातून हरित उर्जा स्त्रोतांकडे होत असलेल्या जागतिक स्थित्यंतराला पाठिंबा देण्याची आमची बांधिलकी दिसून येते. आधुनिक इंजिनियरिंग क्षमता आणि उत्पादन क्षेत्रातील गुणवत्ता यांमुळे जगभरातील कॉम्प्लेक्स एनर्जी प्रकल्पांसाठी महत्त्वाची उपकरणे पुरवणाऱ्या विश्वासार्ह भागिदाराचे स्थान आम्ही मिळवले आहे.’

आम्ही लो अलॉय स्टील मेटल्यर्जीसह उपकरणांचा पुरवठा केला असून त्यात चार उच्च- दाबाचे एक्सचेंजर्स तसेच ब्लू अमोनिया प्लँटसाठीच्या उच्च दाबाच्या सेप्रेटरचा समावेश आहे. एक्सचेंजर्सचे वजन २५० एमटी असून दोन एक्सचेंजर्सची लांबी २६ मीटर आहे. ही उपकरणे उच्च तापमान व दाबाखाली काम करण्यासाठी सक्षम असून त्यातून जास्तीत जास्त उर्जा व प्रक्रिया कार्यक्षमता मिळते.

कंपनीने यापूर्वी ग्रीन हायड्रोजन क्षेत्रासाठी योगदान देत मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या, व्यावसायिक स्तरावरील ग्रीन हायड्रोजन उत्पादन सुविधांपैकी एका केंद्राला हीट एक्सचेंजर्सचा पुरवठा केला आहे. सध्या कंपनी अमेरिकेतील ब्लू हायड्रोजन प्रकल्पासाठीही ऑर्डरची अमलबजावणी करत असून पर्यायाने हरित उर्जा क्षेत्रात जागतिक विस्तार करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments