Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ३०: राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले, शेतकऱ्यांनी या पुस्तिकेतील विविध घटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची माहितीकरीता पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये अभियानातील सर्व घटक मापदंड, सुधारणा व अर्ज प्रक्रिया यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून ‘प्रथम अर्ज प्रथम लाभ’ या तत्वावर निवड होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घ्यावा. पुस्तिका डाऊनलोड करण्याकरीता क्यूआर कोडला स्कॅन करावे.

या अभियानातील घटकांच्या अंमलबजावणी संदर्भात किंवा अडचणी असल्यास संबंधित गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments