Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपनवेल महानगरपालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या अभिनय प्रशिक्षण शिबीर समारोप समारंभ* *कला जोपासाल...

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या अभिनय प्रशिक्षण शिबीर समारोप समारंभ* *कला जोपासाल तर तुम्ही कीर्तीवंत व्हाल…* *-लोकनेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर* *पनवेल परिसरात उत्तमोत्तम कलाकार व्हावेत…* *-आमदार प्रशांत ठाकूर*

*

पनवेल,दि30: नृत्य, गायन, अभिनय अशा विविध कलेपैकी कोणतीही कला जर जोपासली तर तुम्ही नक्की किर्तीवंत व्हाल, कलेमुळे यश मिळावयचे असेल तर त्या दृष्टीने प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज केले.

पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आले होते या शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

या आयोजनाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी नाट्य परिषदेचे अभिनंदन केले. तसेच सर्व रंगकर्मी यांना, प्रशिक्षणार्थींना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देऊन कलाक्षेत्र जोपासण्यासाठी ठाकूर परिवार पनवेलकरांच्या सदैव सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा पनवेल अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर , बाल रंगभूमी परिषद उपाध्यक्ष तथा नाट्य परिषदेच्या कार्यकारणी सदस्य प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर, अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा पनवेलचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अभिनेते प्रकाश राणे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त मंगला माळवे, महापालिका सचिव अक्षय कदम, प्रशिक्षक अशोक केंद्रे,(मुंबई) रवि धुताडमल,(बीड) मनोज चिताडे (वर्धा) आदी मान्यवर उपस्थित होते.

*उत्तमोत्तम कलाकर व्हावेत -* *आमदार प्रशांत ठाकूर*
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना पनवेल कार्यक्षेत्रात उत्तमोत्तम कलाकार बनावेत अशा शुभेच्छा देऊन यासाठी महापालिकेने व पनवेल नाट्य परिषद शाखेने अभिनय शिबीर घेतल्याबद्दल खास आभिनंदन केले. भविष्यात नक्कीच या अभिनय शिबीराचा सर्व प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरपूर फायदा होईल. या निमित्ताने महापालिका सांस्कृतिक चळवळ उभी करून नवीन पायंडा पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

*डॉ. दीपाताई क्षीरसागर*
उपाध्यक्ष बाल रंगभूमी परिषद तथा अखिल भारतीय नाट्य परिषद कार्यकारणी सदस्य प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी सांगितले, आज काल ताणताणवाचे जीवन सर्वजण जगत आहे. शरीराचा ताण कमी करण्यासाठी व्यायाम केला जातो,पण मनावरचा ताण कमी करण्यासाठी कलाच उपयोगी पडते. यासाठी मुलांना गायन,नृत्य, अभिनय अशा विविध कलेचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पनवेल मनपा व नाट्य परिषदअसे उपक्रम घेत घेत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

*माजी सभागृह नेते परेश ठाकूर*
अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा पनवेलचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले, या अभिनय शिबीराच्या माध्यमातून पालिका जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे. जनतेसाबत जाऊन सर्वाशी पालक या नात्याने जवळ जात आहे. मराठी नाट्यसंस्कृती रूजावी , संस्कृती बहरावी यासाठी महापालिका प्रयत्न करत असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व शिबिरार्थींना त्यांनी नाट्यशास्त्राची ओळख हे 250 रुपये किमतीचे पुस्तक भेट दिली. या शिबिराप्लरमाणे लवकरच खारघर परिसरातही अशा प्रकारच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराच्या आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अभिनेते प्रकाश राणे म्हणाले, अभिनय प्रशिक्षणाच्या माध्यमातून पनवेलमध्ये महापालिका बालकांमध्ये नाट्यगुण रूजविण्यासाठी अशा उत्तम प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करते हे विशेष असल्याचे सांगून भविष्यात मोठे रंगकर्मी होण्याचा आर्शिवाद मुलांना दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा. मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल चे कार्यवाह शामनाथ पुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त प्रसेनजित कारलेकर यांनी मानले. सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले.

*चौकट*
सर्व रंगकर्मीयांमार्फत लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या दोन जून ला साजरा होणाऱ्या वाढदिवसासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या समारोप कार्यक्रमात आठ दिवस अभिनय प्रशिक्षण घेतलेल्या सिनीअर आणि ज्युनिअर गटातील प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रशिक्षकांच्या वतीने अभिनेते अशोक केंद्रे यांनी पनवेल मध्ये उत्तम कलावंत असल्याचे सांगितले. उपस्थित प्रशिक्षणा‍र्थींनीही आपल्या मनोगतामध्ये अभिनय शिबीर घेतल्याबद्दल महानगर पालिकेचे आभार मानले.
….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments