Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेवदिवाळीनिमित्त १० हजार पणत्यांनी उजळले लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर - कै.श्रीमती लक्ष्मीबाई...

देवदिवाळीनिमित्त १० हजार पणत्यांनी उजळले लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर – कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दीपोत्सवाचे आयोजन ; पुणेकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे

पुणे : सप्तरंगी दिव्यांनी सजलेले मंदिर… विविधरंगी फुलांची रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. मंदिर परिसरात तेलाच्या १० हजार दिव्यांची आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या १० हजार सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. दीपोत्सवाचे उद्घाटन रामराज्य सहकारी बँकेच्या चेअरमन नंदा नारायण लोणकर, पिसोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहल गणपत दगडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही सजावट केली.

युवराज गाडवे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही देव दिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. कळसावर ओम, श्री व स्वस्तिक च्या शुभचिन्हांची सजावट देखील पणत्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मंदिरात अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये दृश्य कैद करण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments