Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआकार संस्थेचे नांदेड सिटी मध्ये कुटुंब गीतरामायण वर्गाला सुरुवात*

आकार संस्थेचे नांदेड सिटी मध्ये कुटुंब गीतरामायण वर्गाला सुरुवात*

🚩🚩🚩
*आकार संस्थेचे नांदेड सिटी मध्ये कुटुंब गीतरामायण वर्गाला सुरुवात* आठवड्यातून *दोन दिवस व दोन तास गायन* सरावास उत्साहात सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक *ॲड.श्री नरसिंह लगड* संचालक नांदेड सिटी आणि जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते *श्री प्रकाश गोरे, श्री मिलिंद दिक्षित आणि आकारच्या संचालिका चित्राताई देशपांडे* यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले श्री *नरसिंह लगड यांनी नांदेड सिटी सेवा सिटी म्हणून ओळखली जाते* आणि ती ओळख वाढण्यासाठी अनेक नांदेड सिटीवासीय कार्यरत आहेत आणि अजूनही या कार्यात जोडले जातील असे आश्वासन दिले. आकार नांदेड सिटी *कुटुंब गीतरामायण* वर्गाला शुभेच्छा दिल्या *सध्या ४५ जण शुल्क भरून* सभासद झाले आहेत आठवड्यातून दोन दिवस चालणारा वर्ग *कार्ले चौकातील कार्ले प्लाझा दुसरा मजला येथीलपुणे केम्ब्रिज स्कूल* येथे सुरू झाला आहे
श्री प्रकाश गोरे काकांनी *नांदेड सिटी परिसरात चालणाऱ्या अनेक सेवाभावी तसेच सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आणि पुढील काही उपक्रमांचे सूतोवाच केले*. आपण चांगलं आयुष्य जगलो, आपल्या आधीच्या पिढ्यांमुळे पण आपल्या पुढच्या पिढीला चांगलं जगता यावं, यासाठी आपली संस्कृती आपण रूजविणे आणि पुढच्या पिढीला सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा सोपवण्याची आपली जबाबदारी आहे, ते काम आपण सर्वांनी केलं पाहिजे असेही ते म्हणाले *माझं आयुष्य छान गेलं असं म्हणत निवांत न बसता पुढील पिढीला चांगलं काही तरी आपण देऊ शकतो* अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून *हे करता येईल आणि सर्वांनी करावे असे आवाहनही गोरे काकांनी केले*.
चित्राताई देशपांडे यांनी *”आकार”* संस्थेबद्दल माहिती दिली.*साहित्य, संगीतादी कलांची रूजवण, देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि धार्मिक वारसा पुढे चालवला गेला पाहिजे* या विचाराने आकार काम करत आहे असे त्यांनी सांगितले.
*आधुनिक वाल्मिकी ग.दि.माड‌गुळकर आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी अजरामर केलेले गीतरामायण घराघरात पोहोचले पाहिजे*, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे *श्री मिलिंद दिक्षित* यांनी सर्वांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे समायोचित *सूत्रसंचालन सौ गौतमी कुलकर्णी यांनी केले*.
*सौ ख्याती कुलकर्णी यांनी सुरेख रांगोळी* *काढली होती*.
*सौ मोनाली शहा व सौ गौतमी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची व्यवस्था* सांभाळली.
*आकार सिंहगड शाखेच्या सख्यांनी “ये ये तू ये श्रीरामा” हे गीत* सादर केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments