प्रमुख निष्कर्ष:
• भारतीय एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाचा संरक्षण गुणांक फक्त 35 – डिजिटल शहरी सरासरीपेक्षा 20 अंकांनी कमी
• डिजिटली-जाणकार शहरी भारतीयांच्या 82% च्या तुलनेत या समूहाची जीवन विमा मालकी फक्त 66%
• काम करणाऱ्या महिलांसाठी जीवनविम्याची टक्केवारी 48 वर कायम आहे; तर नोकरदार पुरुषांसाठी जीवन विम्याची टक्केवारी 50 पर्यंत गेली आहे. त्यामुळे लिंगभेद वाढत असल्याचे दिसून येते.
• महागाई, वैद्यकीय आणीबाणी आणि कमावत्या व्यक्तीचे निधन यासारख्या आर्थिक चिंता काम करणाऱ्या महिलांमध्ये अधिक तीव्र आहेत.
• आर्थिक नियोजनाच्या वर्तनात बदल हे सर्वसमावेशक हस्तक्षेपांची तातडीची गरज दर्शवितात.
नवी दिल्ली, 13 जून 2025: अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड (“अॅक्सिस मॅक्स लाईफ” / “कंपनी”) ने जगातील आघाडीची मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स कंपनी कंटार यांच्या भागीदारीत आपल्या इंडिया प्रोटेक्शन कोशिएंट (आयपीक्यू) अभ्यासाच्या सातव्या आवृत्तीतील निकाल जाहीर केले. IPQ 7.0 चा अभ्यास 25 शहरी भारतीय शहरांमधील 6,360 घरांमध्ये करण्यात आला असून तो वंचित समुदायांमध्ये – विशेषतः एलजीबीटीक्यूआयए+ समाज आणि काम करणाऱ्या महिलांमध्ये आर्थिक तयारीतील गंभीर तफावत अधोरेखित करतो.
एलजीबीटीक्यूआयए+ समाज: आर्थिक सज्जता असूनही आर्थिक संरक्षणाचा अभाव
एलजीबीटीक्यूआय+ समाज 35 च्या प्रोटेक्शन कोशंट स्कोअरसह (0-100 च्या स्केलवर) डिजिटल साक्षर शहरी सरासरी 56 च्या तुलनेत मागे आहे आणि त्यातून मोठी आर्थिक असुरक्षितता दिसून येते. समुदायाचा नॉलेज इंडेक्स स्कोअर 61 आहे, तर तंत्रज्ञान स्नेही शहरी भारतीयांचा (डीएसयूआय) हाच गुणांक 74 आहे – त्यातून जीवन विम्याबद्दल कमी जागरूकता दिसते. डीएसयूआयची जीवन विम्याची मालकी 82% असून या समाजाकडे ती 66% आहे आणि डीएसयूआय प्रतिसादाकर्त्यांची मुदत विम्याची मालकी 48 तर एलजीबीटीक्यूआयची+ 27 आहे. समुदायाची आर्थिक सुरक्षितता देखील कमी झाली आहे. आयपीक्यू 6.0 मध्ये ही सुरक्षितता 42 होती. ती आता आयपीक्यू 7.0 मध्ये 39 पर्यंत घसरली आहे. कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू, वैद्यकीय खर्च आणि घरगुती बजेट व्यवस्थापित करण्याबद्दल वाढती चिंता हे प्रमुख ताणतणाव असल्याचे दिसले.
या समाजाने ऐतिहासिकदृष्ट्या उत्तम बचत वर्तन दाखवले असले तरी, आयपीक्यू 7.0 मध्ये सक्रिय आर्थिक नियोजनातील घट अधोरेखित झाली आहे. त्यातून केंद्रित आर्थिक शिक्षण आणि त्यांच्याशीट विशेष उत्पादनांची आवश्यकता अधोरेखित होते.
लिंग असमानता तीव्र: महिलांचा आर्थिक आत्मविश्वास ढासळला
आयपीक्यू 7.0 मध्ये काम करणाऱ्या पुरुष आणि महिलांमधील वाढती संरक्षण तफावत दिसून येते. काम करणाऱ्या पुरुषांचा संरक्षण गुणांक 50 पर्यंत वाढला (आयपीक्यू 6.0 मधील 47 वरून) तर काम करणाऱ्या महिलांचा 48 वर कायम राहिला. त्यामुळे मागील वर्षातील समानता कमी झाली. काम करणाऱ्या महिला निवृत्ती, मुलांचे शिक्षण आणि लग्न यासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये कमी आर्थिक सुरक्षिततेची तक्रार करतात. त्या महागाई, वैद्यकीय खर्च आणि कमावत्या व्यक्तीच्या नुकसानाबद्दलही अधिक चिंता व्यक्त करतात – त्यामुळे लिंग-प्रतिसादात्मक नियोजन आणि संबंधित साधनांची आवश्यकता दिसून येते.
अॅक्सिस मॅक्स लाईफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत त्रिपाठी म्हणाले:
“आयपीक्यू 7.0 च्या निष्कर्षांमुळे वंचित वर्गांमध्ये आर्थिक संरक्षणात स्पष्ट तफावत दिसून येते. एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाने संरक्षण गुणांकात फक्त 35 गुण मिळवले आहेत आणि काम करणाऱ्या महिला 48 वर स्थिर आहेत. त्यामुळे केवळ हेतू तयारीत रूपांतरित होत नाही हे स्पष्ट होते. ही तफावत भरून काढण्यासाठी उद्योगाने विश्वास निर्माण करणे, लक्ष्याधारित जागरूकता आणि सुलभतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सहानुभूती आणि वास्तविक जगातील आयुष्यावर आधारित समावेशक आर्थिक परिसंस्था तयार करणे सर्वांसाठी संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचे आहे यावर अॅक्सिस मॅक्स लाईफमध्ये विश्वास ठेवला जातो.”
आयपीक्यू 7.0 मधील निष्कर्षातून आर्थिक साक्षरता आणि संरक्षण धोरणांची आवश्यकता अधोरेखित केली गेली आहे. ते समावेशक आणि ओळख, लिंग आणि उत्पन्न विविधतेसाठी संवेदनशील आहेत. अधिक लवचिक उत्पादने डिझाइन करण्यापासून ते डिजिटल आणि सल्लागारांचा समावेश वाढवण्यापर्यंत, उद्योगाने प्रत्येक भारतीयाला सहभावना आणि अचूकतेने सेवा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. अॅक्सिस मॅक्स लाईफसाठी हे एक महत्त्वाचे कार्य असून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समावेशक भारत निर्माण करण्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.


