Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो

पुण्यात डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो

पुणे,13 डिसेंबर 2023 : द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे भारतातील पहिला नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो पुण्यात 15 व 16 डिसेंबर 2023 रोजी डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमात इलेक्ट्रिफाईंग मोबिलिटी, क्लीन टेक फॉर फ्युएल ऑफ फ्युचर,मोबिलिटी अ‍ॅन्ड व्हेईकल डिझाईन आणि अर्बन मोबिलिटी इत्यादी विषयांचा समावेश आहे. सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो मध्ये प्रदर्शन व विविध विषयांवरील परिसंवांदांचा समावेश आहे. सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2023 मध्ये उद्योग क्षेत्रातील भागधारक, धोरणकर्ते, नवउद्योजक, संशोधक आणि या क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिक पुण्यातील या परिवर्तनीय एक्स्पोमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

4000 चौ.मी. प्रदर्शन क्षेत्रामध्ये विस्तारलेेल्या या एक्स्पोमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे प्रतिनिधित्व करणारे 100 हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. उद्योग, व्यापार आणि सरकारी क्षेत्रातून सुमारे 3000 हून अधिक व्यावसायिक या एक्स्पोला भेट देतील. या दोन दिवसीय एक्स्पोमध्ये वाहन उद्योग,इंधनाचे भविष्य आणि शहरी गतिशीलता या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इंटरएक्टिव्ह टेक डेमो आणि उत्पादनांच्या सादरीकरणासह टेक्नोलॉजी फोरम्स, फ्युच्युरिस्टिक अ‍ॅन्ड कॉन्सेप्ट व्हेईकल्सचा एक्स्पोमध्ये समावेश असेल. यामुळे जागतिक स्तरावर नेटवर्किंगसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील.

या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय उद्योगातील नेतृत्व,वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि सीआयआयचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या दोन दिवसीय एक्स्पोमध्ये वाहन उद्योग,इंधनाचे भविष्य आणि शहरी गतिशीलता, वाहन रचना यासारख्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इंटरएक्टिव्ह टेक डेमो आणि उत्पादनांच्या सादरीकरणासह टेक्नोलॉजी फोरम्स, फ्युच्युरिस्टिक अ‍ॅन्ड कॉन्सेप्ट व्हेईकल्सचा एक्स्पोमध्ये समावेश असेल. यामुळे जागतिक स्तरावर नेटवर्किंगसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील.

प्रदर्शनात सहभागी होणार्‍या प्रमुख संस्थांमध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी),पुणे महानगरपालिका,पुणे महानगरपरिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट यासारख्या शासकीय संस्था यांचा समावेश आहे.या प्रदर्शनात सहभागी होणार्‍या आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स लि.,ग्रीव्हज कॉटन,आरएसबी ट्रान्समिशन,ब्रगईकनेक्ट,टाटा मोटर्स,रिलायन्स इंडस्ट्रीज,बेलराईज इंडस्ट्रीज,फ्लिटगार्ड फिल्ट्रम,विकास ग्रुप,टॉर्क मोटर्स यांसह टोयोटा,श्कोडा,सिट्रॉन,न्यु व्हेईकल डेव्हलपमेंट रिलायन्स,आयआयटी मुंबई आणि डब्ल्यूआरआय यांचा समावेश आहे.

सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शोे मध्ये अनेक अद्ययावत मोबिलिटी सोल्युशन्सचे अनावरण होणार असून त्यामध्ये ई-पॉवरट्रेन उत्पादने,ई-ड्राईव्हट्रेन,इंजिन कुलिंग सोल्युशन्स,बॅटरी थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम्स, इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या वाहनांसाठी सुयोग्य सस्पेंशन्स यांचा समावेश आहे. या शो मध्ये फास्ट डीसी चार्जिंग गनचे अनावरण देखील करण्यात येणार आहे.

सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो 2023 व सीआयआय डब्ल्यूआर टास्कफोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे अध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, भारतातील वाहन उद्योग झपाट्याने विकसित होत असून स्थानिक आणि जागतिक पातळीवरील ओईएम कंपन्यांना भविष्यातील वाहनांसाठी उपकरणे,प्रणाली व सुटे भाग पुरविण्याकरिता देशांतर्गत कंपन्यांना मोठी संधी आहे.त्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगातील सर्व भागधारकांना त्यांची उत्पादने आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याबरोबरच भविष्यातील आव्हाने व संधींवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठावर एकत्र आणणे गरजेचे होते.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीआयआय अर्बन मोबिलिटी शो 2023 चे अध्यक्ष डॉ.संजय कोलते म्हणाले की,स्मार्ट ई-बसेस सारख्या उपक्रमांद्वारे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.(पीएससीडीसीएल) ने स्मार्ट मोबिलिटीवर भर दिला आहे,ज्यामुळे शाश्‍वत आणि कार्यक्षम वाहतूकीसाठी मदत झाली आहे. अ‍ॅडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम सारखी यंत्रणा ट्रॅफिक सिग्नल्सचे आधुनिकीकरण आणि संलग्नीकरण करेल.रस्त्याच्या पुर्नरचनेच्या कामाद्वारे पादचार्‍यांचा अनुभव सुधारण्यासाठी फूटपाथ आणि सायकल ट्रॅक निर्माण करण्यात आले आहेत.सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो हा उपक्रम स्मार्ट आणि शाश्‍वत शहरी मोबिलिटी सोल्युशन्सला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे अरविंद गोयल, ग्रीव्हज कॉटन चे डॉ.अरुप बसू, आरएसबी ट्रान्समिशन चे रजनीकांत बेहरा, पुणे स्मार्ट सिटी चे डॉ संजय जी. कोलते आयएएस,पुणे महानगरपालिकेचे विक्रम कुमार आयएएस, ग्रीव्हज कॉटन चे संदीप चौधरी, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी चे आनंद कुलकर्णी, द ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) चे राहुल महाजन, टाटा मोटर्स चे अजय जैन, , केमट्रोल्स इंडस्ट्रीज चे नंदकुमार के, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया चे डॉ. मार्क स्टेहलिन, सँडविक कोरोमॅन्ट इंडिया चे किरण आचार्य , झी बिझनेस च्या स्वाती खंडेलवाल, रिलायन्स इंडस्ट्रीज चे नितीन सेठ, कायनेटिक ग्रीन च्या सुलज्जा फिरोदिया मोटवानी, ब्रुगई कनेक्ट एजी स्वित्झर्लंड चे दीपल शाह, टुबासेक्सचे अजय संब्रानी, श्नायडर इलेक्ट्रिक चे आशुतोष शुक्ला , सीमेन्स चे अमित केकरे, कमिन्स इंडिया चे संदेश सदावर्ते, आयडीसी स्कूल ऑफ डिझाइन, आयआयटी मुंबई चे प्रा. निशांत शर्मा, भारत पेट्रोलियम चे दिव्येंदू डी सरकार, एस्कॉर्ट्स कुबोटा चे आनंद विष्णू गावडे आदी मान्यवर परिषदेत मार्गदर्शन करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments