Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedध्येयवादी मनुष्य निर्माण हेच रा. स्व. संघाचे कार्य* - प्रांत कार्यवाह डॉ....

ध्येयवादी मनुष्य निर्माण हेच रा. स्व. संघाचे कार्य* – प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव – पुण्यात महाविद्यालयीन संघ शिक्षा वर्गाचे आयोजन;१५३ शिक्षार्थी सहभागी

*

पुणे, दिनांक १६ जून २०२५ ः जगभरातील हिंदूंचे सघटन करणे आणि ध्येयवादी मनुष्य निर्माण करणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे, असे प्रतिपादन संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगाव यांनी केले. पुण्यात आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

संघाच्या महाविद्यालयीन विभागाचा हा वर्ग १४ ते ३० जून २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या वर्गात पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून १२२ तर इतर प्रांतातून ३१ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये कोकण, देवगिरी, विदर्भ आणि सौराष्ट्र प्रांताचा समावेश आहे. डॉ. दबडगाव यांनी संघ शिक्षा वर्गांची पार्श्वभूमी आणि संघातील त्याचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, “हिंदूंचे सशक्तिकरण आणि राष्ट्रीय विचारांचा मनुष्य निर्माण करण्यासाठी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी शाखेचे तंत्र समाजाला दिले. प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून असे सामाजिक आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान स्वयंसेवकांना प्राप्त होते. एक प्रकारे स्वयंसेवकाच्या भूमिकेतून कार्यकर्ता निर्माण यातून होते. वर्गात स्वयंसेवकांच्या जडण-घडणीसाठी शारीरिक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते. संपूर्ण देशभरात अशीच रचना आहे.” नवीन मित्र जोडणे, एक तासाच्या शाखेचे नियोजन, नवीन सामाजिक समस्यांची जाणीव, त्यावरील उपाय, समाजमाध्यमांचा वापर अशा अनेक बिंदूंवर वर्गात प्रशिक्षण मिळते. वर्गाचे पालक गुरूनाख शिरोडकर, सर्वाधिकारी महेश भाटिया, वर्गकार्यवाह सागर साळुंखे आणि वर्गाचे मुख्यशिक्षक राजेंद्र पाटील हे आहेत.

१९२८ पासून संघ शिक्षा वर्ग ः
संघाच्या स्थापनेनंतर १९२८ पासून स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणासाठी संघ शिक्षा वर्ग सुरू करण्यात आले. पूर्वी २१ दिवसांचे वर्ग असायचे. ज्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ग असे संबोधले जायचे. आता संघ शिक्षा वर्ग, कार्यकर्ता विकास वर्ग-१ आणि कार्यकर्ता विकास वर्ग – २ असे संबोधले जाते. पहिले दोन वर्ग प्रत्येक प्रांतात स्वतंत्र होतात. अतिम म्हणजे कार्यकर्ता विकास वर्ग -२ हा नागपूर येथे होतो. शिक्षार्थी स्वयंसेवकांच्या विशेषत्वानूसारही वर्गांचे आयोजन होते. जसे की पुण्यात आयोजित हा वर्ग व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे.
———

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments